‘रुही’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, राजकुमार-जाह्नवीच्या जबरदस्त अभिनय!

‘रुही’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, राजकुमार-जाह्नवीच्या जबरदस्त अभिनय!

राजकुमार राव (Rajkummar Rao), जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) आणि वरुण शर्माचा (Varun Sharma) ‘रुही’(Roohi) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 16, 2021 | 3:42 PM

मुंबई : राजकुमार राव (Rajkummar Rao), जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) आणि वरुण शर्माचा (Varun Sharma) ‘रुही’(Roohi) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट हॉरर-कॉमेडी असून तिघांचाही यामध्ये जबरदस्त लूक दिसत आहे. चित्रपटात जाह्नवीच्या अंगात एक भूत शिरते आणि राजकुमार राव आणि वरुण शर्मा जाह्नवी कपूरचे अपहरण करतात, परंतु या अपहरणानंतर तिचे रूप बदलते. (Roohi’s movie trailer release)

जाह्नवीच्या अंगातून भूत काढण्यासाठी राजकुमार राव आणि वरुण शर्मा अनेक उपायोजना करताना दिसत आहेत. या चित्रपटात कॉमेडीबरोबर हॉरर सीन दाखवण्यात आले आहेत. जाह्नवीनेही यामध्ये उत्तम अभिनय केला आहे. हा चित्रपट दिनेश विजानचा हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा दुसरा भाग आहे. त्याचा पहिला भाग ‘स्त्री’ होता जो वर्ष 2018 मध्ये रिलीज झाला होता.

राजकुमार राव ‘स्त्री’ चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसला होता. त्यामध्ये श्रद्धा कपूरसोबत दिसली होती. स्त्री चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. यानंतर दिनेश विजानने आता याचा दुसरा भाग घेऊन आला आहे आणि त्याचे ट्रेलर रिलीज केलं आहे. आता चाहते ‘रुही’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. जाह्नवी सध्या आगामी ‘गुड लक जेरी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटात जाह्नवीचा लूक समोर आला होता, त्यात जाह्नवी पंजाबी लूकमध्ये दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ सेन करत आहे. पंकज मट्टा यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय यांनी केली असून यात जान्हवी कपूरसह दीपक डोबरियाल, सुशांत सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याखेरीज जाह्नवी देखील ‘दोस्ताना 2’ चित्रपटात दिसणार आहे.

संबंधित बातम्या : 

अभिनेता संदीप नहारची हत्या? गळ्यावर जखमा, पत्नीवर संशय, मोठं ट्विस्ट

डार्लिंग्स चित्रपटात शाहरुख खान आणि आलिया भट्टसोबत काम करणार!

मोहन भागवत अभिनेते मिथुन चक्रवर्तींच्या घरी, बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

(Roohi’s movie trailer release)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें