अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ आता उत्तर प्रदेशात शूट होणार नाही, निर्मात्यांनी घेतला हा निर्णय !

अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' आता उत्तर प्रदेशात शूट होणार नाही, निर्मात्यांनी घेतला हा निर्णय !

अक्षय कुमारने (Akshay Kumar) आगामी बच्चन पांडे (Bachchan Pandey) चित्रपटचे शूटिंग सुरू केले आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 12, 2021 | 12:46 PM

मुंबई : अक्षय कुमारने (Akshay Kumar) आगामी बच्चन पांडे (Bachchan Pandey) चित्रपटचे शूटिंग सुरू केले आहे. अक्षयने काही दिवसांपूर्वी चित्रपटातील त्याच्या नव्या लूकचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अक्षय राउडी गँगस्टर लूकमध्ये दिसत होता. आता या चित्रपटाविषया एक मोठी बातमी पुढे येत आहे. या चित्रपटाचे शूटिंग जानेवारीपासून जैसलमेरमध्ये सुरू आहे. (Akshay Kumar’s Bachchan Pandey movie will not be shot in Uttar Pradesh)

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

निर्मात्यांना हे शहर इतके आवडले झाले की, त्यांनी शूटिंगचे वेळापत्रक बदलले आहे. चित्रपटाचे पुढचे शूटिंग उत्तर प्रदेशमध्ये वेळापत्रकानुसार होणार होते मात्र, ते रद्द करून त्यांनी शूटिंग जैसलमेर करणार आहेत. निर्मात्यांनी अचानकपणे चित्रपटाच्या वेळापत्रकामध्ये बदल केल्यामुळे आर्श्चय व्यक्त केले जात आहे. ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि कृती सैनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

याशिवाय अरशद वारसी, जॅकलिन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी हे स्टारही या चित्रपटात दिसणार आहेत.‘बच्चन पांडे’ हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. पंकज त्रिपाठी ‘सुपर 30′ आणि ’83’ नंतर आता बच्चन पांडेमध्ये तिसऱ्यांदा साजिद नाडियाडवालासोबत काम करणार आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी हे प्रथमच एकत्र स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत.

संबंधित बातम्या : 

आमिर खानच्या मुलीचं जमलं हो जमलं, फोटो शेअर करत म्हणाली…

विक्रम भट्टच्या ‘अनामिका’ वेब सीरिजच्या सेटवर गुंडांचा जोरदार हंगामा, सनी लिओनीला सुरक्षित स्थळी हलवले !

शस्त्र परवाना प्रकरणात सलमानला दिलासा, काळवीट प्रकरण झटका देणार?

(Akshay Kumar’s Bachchan Pandey movie will not be shot in Uttar Pradesh)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें