Drugs Case | आर्यनसोबतच्या संभाषणात 3 वेळा अनन्याच्या नावाचा उल्लेख, तरी अभिनेत्री म्हणते ती तर सर्व थट्टा!

एनसीबीतर्फे आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेची (Ananya Panday) ज्या चॅटच्या आधारे चौकशी केली जात आहे, त्या संदर्भातली एनसीबीच्या सूत्रांनी काही माहिती दिली आहे. आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्या या संभाषणामध्ये तीन वेळा वीड ड्रग पुरवल्याच्या संशय अनन्यावर आहे.

Drugs Case | आर्यनसोबतच्या संभाषणात 3 वेळा अनन्याच्या नावाचा उल्लेख, तरी अभिनेत्री म्हणते ती तर सर्व थट्टा!
Aryan-Ananya Panday
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 3:09 PM

मुंबई : एनसीबीतर्फे आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेची (Ananya Panday) ज्या चॅटच्या आधारे चौकशी केली जात आहे, त्या संदर्भातली एनसीबीच्या सूत्रांनी काही माहिती दिली आहे. आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्या या संभाषणामध्ये तीन वेळा वीड ड्रग पुरवल्याच्या संशय अनन्यावर आहे.

दरम्यान, आर्यन खान आणि आणण्याचे हे संभाषण 2018-19 वर्षांमधील आहे. हेच चॅट आता संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. आर्यनला दोन वेळा आणि एकदा एका गेट टुगेदरमध्ये वीड पुरवण्याच्या संदर्भात झालेल्या चॅटमध्ये अनन्या पांडेच नाव आले आहे.

याप्रकरणी अनन्या पांडेचे दोन्ही फोन जप्त करण्यात आले आहेत. त्यापैकी एक जुना हँडसेट असून, अनन्या पांडेचा दुसरा फोन, जो काही महिन्यांपूर्वी खरेदी करण्यात आला होता, त्याचाही समावेश आहे. एनसीबीने पुरावे नष्ट करण्याचा धोका लक्षात घेऊन हे फोन जप्त केले होते.

उत्तरं देताना गोंधळली अभिनेत्री

ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी आजही (22 ऑक्टोबर) सुरू राहील. चौकशी दरम्यान अनन्या पांडे अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात गोंधळलेली देखील दिसली. एनसीबीच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानच्या मोबाईलवरून मिळालेल्या चॅटच्या आधारे अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावले गेले आहे.

एनसीबीच्या सूत्रांनुसार, 2018-19 मध्ये आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यात झालेल्या या संभाषणात ड्रग  पुरवठ्याशी संबंधित 3 वेळा नाव समोर आले आहे. ज्यामध्ये ड्रग पेडलर्सचे नंबर  देखील आर्यन खानने अनन्या सोबत शेअर केले होते. माहितीनुसार, या संभाषणात हे देखील उघड झाले आहे की, आर्यन खानने अनन्या पांडेला 2 वेळा वीड अर्थात गांजा आणण्यास सांगितले होते, नंतर अनन्याने ते आर्यनला पाठवले होते.

यावेळीही प्रयत्न करायला आवडेल…

या व्यतिरिक्त, जेव्हा अनन्या आणि आर्यन मित्रांसोबत गेट टुगेदरसाठी भेटण्याची तयारी करत होते, तेव्हा आर्यनच्या सांगण्यावरून, अनन्याने गांजा आणण्याची बाब या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये समोर आली आहे. जिथे अनन्या स्वतः आर्यन खानला सांगते की, तिने याआधीही प्रयत्न केला आहे आणि या वेळीही करून पाहायला आवडेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीला इतर अनेक चॅट मिळाले आहेत, ज्याबद्दल अनन्या पांडेची आज चौकशी केली जाणार आहे.

सध्या एनसीबीने काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेला अनन्या पांडेचा जुना हँडसेट, नवीन हँडसेट आणि लॅपटॉप जप्त केला आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या पुराव्या सोबत कोणतेही टेम्परिंग केले जाऊ नये.

अनन्या पांडे आर्यन-सुहानाची जिवलग मैत्रीण

अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. चंकी आणि शाहरुख खानच्या मुलांमध्ये चांगली मैत्री आहे. अनन्या पांडे ही शाहरुख खानची मुलगी सुहाना खानची बालपणीची जिवलग मैत्रीण आहे. अनन्याची आर्यन खान सोबतही मैत्री आहे. अनन्या पांडेने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याची निर्मिती करण जोहरने केली होती.

हेही वाचा :

Ananya Panday | आर्यन-अनन्याच्या संभाषणाची सखोल चौकशी होणार, अनन्या पांडे पुन्हा NCBला सामोरी जाणार!

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणात NCBची धडक कारवाई, आणखी एक ड्रग्ज पेडलरला घेतले ताब्यात!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.