Drugs Case | आर्यन खानला गांजा पुरवण्याचं मान्य केलं होतं, अनन्या म्हणते ती तर सर्व थट्टा, एनसीबीसमोर नेमकं काय झालं?

एनसीबी सलग दुसऱ्या दिवशी आर्यन खानच्या मुंबई क्रूज ड्रग पार्टी प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी केलेल्या चौकशीत एनसीबीला अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत, ज्यात ड्रग्ज प्रकरणाचा सर्वात मोठा दुवा म्हणजे आर्यनच्या अनन्याशी गप्पा.

Drugs Case | आर्यन खानला गांजा पुरवण्याचं मान्य केलं होतं, अनन्या म्हणते ती तर सर्व थट्टा, एनसीबीसमोर नेमकं काय झालं?
Aryan-Ananya Panday

मुंबई : एनसीबी सलग दुसऱ्या दिवशी आर्यन खानच्या मुंबई क्रूज ड्रग पार्टी प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी केलेल्या चौकशीत एनसीबीला अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत, ज्यात ड्रग्ज प्रकरणाचा सर्वात मोठा दुवा म्हणजे आर्यनच्या अनन्याशी गप्पा. अनन्या सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात पोहचणार होती, पण अजून पोहोचली नाही.

अनन्याने गांजाची व्यवस्था केली?

आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्या चॅटमध्ये एका ठिकाणी आर्यन अनन्याशी गांजाबद्दल बोलत होता. आर्यन विचारत होता काही, ‘गांजाचा काही जुगाड होऊ शकतो का?’ यावर अनन्याने उत्तर दिले की, ‘मी व्यवस्था करीन.’ एनसीबीने अनन्याला हे चॅट दाखवले आणि प्रश्न विचारला ज्याला अनन्याने उत्तर दिले की, मी फक्त विनोद करत होते.

‘आर्यनसोबत सिगारेटबद्दल बोलले, मी कधी ड्रग्स घेतले नाही’

अनन्याला एनसीबीने चॅटवर सतत प्रश्न विचारले असले, तरी तिचे उत्तर असे होते की, आर्यनशी तिचे जे काही संभाषण होते ते सिगारेटबद्दल होते. आम्ही ड्रग्जबद्दल बोललो नाही. अनन्याला विचारले की, तिने कधी ड्रग्ज घेतले आहे का, तेव्हा अभिनेत्रीने स्पष्टपणे नकार दिला.

चौकशी करण्यापूर्वी घाबरली होती अनन्या

पहिल्या दिवसाच्या चौकशीत अनन्या वडील चंकी पांडेसोबत पोहोचली होती. चौकशी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी अनन्या खूप घाबरली होती आणि चंकी पांडेला मिठी मारून रडली. नंतर, अनन्या एकटीच चौकशी कक्षात दाखल झाली, जिथे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली.

अनन्याविरुद्ध पुरावा सापडला नाही

एनसीबीला आर्यन आणि अनन्या यांच्यात नशेच्या संदर्भात गप्पा झाल्या, यावरून चौकशी करण्यात आली. परंतु एनसीबीच्या मते, त्यांना अद्याप असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, जे पुष्टी करू शकतात की अनन्याने आर्यनसाठी कधीही कोणत्याही ड्रग्जची व्यवस्था केली आहे.

अनन्याने शूटिंगचे वेळापत्रक बदलले!

एनसीबीच्या आवाहनानंतर अनन्या पांडेचे काम ठप्प झाले आहे. एनसीबीने अनन्याचा फोन जप्त केला आहे. तिला काही दिवसांनी एका जाहिरातीचे शूटिंग करायचे होते. मात्र, सद्य परिस्थिती लक्षात घेता अनन्याने तिच्या टीमला काही दिवसांसाठी त्यांच्या शूटचे वेळापत्रक पुढे ढकलण्यास सांगितले आहे.

पहिल्या दिवसाच्या चौकशीत एनसीबीने ‘हे’ प्रश्न विचारले

एनसीबी कार्यालयात अनन्या पांडे हिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न अनन्याला विचारले गेले :

तुम्हाला आर्यन खान माहित आहे का?

तुम्ही आर्यन खानला ड्रग्ज घेताना पाहिले का?

आर्यन खानने ते ड्रग्ज कोणाकडून घेतले?

तुम्हीही आर्यन खान सोबत ड्रग्ज घेतलेत का?

आर्यन खान किती काळ ड्रग्स घेत आहे?

आर्यन खान कोणत्या प्रकारचे ड्रग्ज घेत होता?

ते ड्रग्ज कोणी पुरवले?

ड्रग्ज पुरवणारे कोण होते?

कोणत्या प्रसंगी हे ड्रग्ज वापरले गेले?

ड्रग्ज घेतल्याची तारीख तुम्हाला आठवते का?

ड्रग्ज घेणे बेकायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

आर्यन खानची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आर्यनला सुनावणीपर्यंत तुरुंगात राहावे लागेल. आर्यनला 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने अटक केली होती.

अनन्या पांडे आर्यन-सुहानाची जिवलग मैत्रीण

अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. चंकी आणि शाहरुख खानच्या मुलांमध्ये चांगली मैत्री आहे. अनन्या पांडे ही शाहरुख खानची मुलगी सुहाना खानची बालपणीची जिवलग मैत्रीण आहे. अनन्याची आर्यन खान सोबतही मैत्री आहे. अनन्या पांडेने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याची निर्मिती करण जोहरने केली होती.

हेही वाचा :

Ananya Panday | आर्यन-अनन्याच्या संभाषणाची सखोल चौकशी होणार, अनन्या पांडे पुन्हा NCBला सामोरी जाणार!

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणात NCBची धडक कारवाई, आणखी एक ड्रग्ज पेडलरला घेतले ताब्यात!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI