Arijit Singh Retirement : निवृत्तीनंतर अरिजीत सिंग काय करणार? भविष्यातील खास प्लॅन आला समोर
Arijit Singh Future Plan : अरिजीत सिंगने सोशल मीडिया पोस्टद्वारे पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता अरिजित सिंग आगामी काळात काय करणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने आपल्या चाहत्यांना मोठा धक्का देत पार्श्वगायनातून सन्यास घेतला आहे. अचानक केलेल्या या घोषणेमुळे त्याच्या लाखो चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अरिजीतने सोशल मीडिया पोस्टद्वारे पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केली आहे. याचाच अर्थ अरिजीत इथून पुढे चित्रपटांसाठी गाणी गाणार नाही. त्यामुळे आता अरिजित सिंग आगामी काळात काय करणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला आहे. निवृत्तीची घोषणा करण्यासोबतच अरिजीतने आपल्या भविष्यातील प्लॅनबाबतही माहिती दिली आहे. अरिजीतने नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
अरिजीत सिंग निवृत्तीनंतर काय करणार?
दिग्गज गायक अरिजीत सिंगने पार्श्वगायक म्हणून निवृत्ती घेतली आहे, तो आता चित्रपटांसाठी गाणी गाणार नाही. मात्र तो संगीत क्षेत्रात काम करत राहणार आहे. अरिजीतने सांगितले की मी आता कोणत्याही नवीन चित्रपटांसाठी गाणी गाणार नाहीत, मात्र संगितापासून दूरही जाणार नाही. मी माझ्या स्वतःच्या प्रकल्पांवर आणि स्वतंत्र संगीतावर काम करत राहणार असल्याचे अरिजीतने स्पष्ट केले आहे.
अरिजीत सिंग स्टेज शो करणार
अरिजीत सिंगने निवृत्तीची घोषणा करताना भविष्यात संगीताचा अधिक बारकाईने अभ्यास करायचा आहे अशी माहिती दिली आहे. अरिजीत चित्रपटांसाठी गाणे गाणार नाही, मात्र त्याचे स्टेज शो सुरू राहणार आहेत. अरिजीतने हेही सांगितले की, मी याआधी ज्या गाण्यावर काम केलेले आहे, ती गाणी लवकरच रिलीज होणार आहेत. त्यानंतर मात्र अरिजीत चित्रपटांसाठी गाणी गाताना दिसणार नाही.
अरिजीत सिंगची प्रसिद्ध गाणी
अरिजीत हे बॉलिवूडच्या गायन जगतातील एक मोठे नाव आहे. त्याने बॉलिवूडला अनेक उत्कृष्ट गाणी दिली आहेत. यात “अगर तुम साथ हो,” “लहरा दो,” “हमारी अधुरी कहानी,” आणि “सतरंगा” यांचा समावेश आहे. अरिजीतने 2011 साली इमरान हाश्मीच्या “मर्डर 2” मधील “फिर मोहब्बत करने चला” या गाण्याने चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. या गाण्यामुळे तो रातोरात स्टार बनला होता. त्यानंतर त्यांना कधीही मागे वळून पाहिले नाही. मात्र आता त्याचे चित्रपटातील गाण्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
