‘नट्टू काकां’प्रमाणेच शेवटची इच्छा म्हणून चेहऱ्यावर मेकअपचा साज घेऊन अंतिम प्रवासाला गेले ‘हे’ लाडके कलाकार!

‘नट्टू काकां’ची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांचे नुकतेच निधन झाले. ते कर्करोगाने ग्रस्त होते आणि तरीही त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची इच्छा होती. मृत्यूपूर्वी आपले अंत्यसंस्कार मेक-अपसह झाले पाहिजेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

'नट्टू काकां'प्रमाणेच शेवटची इच्छा म्हणून चेहऱ्यावर मेकअपचा साज घेऊन अंतिम प्रवासाला गेले ‘हे’ लाडके कलाकार!
Ghanshyam Nayak

मुंबई : सब टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये ‘नट्टू काकां’ची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांचे नुकतेच निधन झाले. ते कर्करोगाने ग्रस्त होते आणि तरीही त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची इच्छा होती. मृत्यूपूर्वी आपले अंत्यसंस्कार मेक-अपसह झाले पाहिजेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. तथापि, नट्टू काका एकमेव कलाकार नाहीत ज्यांना अंत्यसंस्कारापूर्वी मेकअप केला गेला. यापूर्वीही असे अनेक कलाकर होते, ज्यांची शेवटची इच्छा मरणोत्तर मेकअप करून जग सोडण्याची होती. कॅमेरासमोर नेहमी मेकअपमध्ये असणाऱ्या या कलाकारांची इच्छा होती की, जेव्हा ते पंचतत्वात विलीन होतील, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मेकअप असावा आणि याच अवस्थेत त्यांनी जगाला निरोप द्यावा.

आज आम्ही तुम्हाला अशाच काल्कारांबाद्द्ल सांगणार आहोत, ज्यांनी आयुष्याच्या मंचावर शेवटचे पात्र साकारताना असाच प्रकारे जगाचा निरोप घेतला होता.

श्रीदेवी

आपल्या चेहऱ्यावरचे भाव आणि बोलक्या डोळ्यांनी लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या श्रीदेवी यांनी 24 फेब्रुवारी 2018 रोजी जगाचा निरोप घेतला. बॉलिवूड इंडस्ट्रीची पहिली महिला सुपरस्टार अंत्यसंस्कारापूर्वी अगदी वधूसारखी सजली होती. तिचा संपूर्ण मेक-अप राणी मुखर्जीचा मेकअप मॅन राजेश पाटील यांनी केला होता. कारण श्रीदेवींना राजेश पाटील यांचे काम आवडले होते. शेवटच्या प्रवासात श्रीदेवी तिच्या आवडत्या दागिन्यांनी सजलेली होती. तिच्या कपाळावर लाल सिंदूर आणि बिंदिया लावून श्रीदेवी तिच्या अंतिम प्रवासाला निघाली होती.

दिव्या भारती

दिव्या भारती त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक होती ज्यांनी लहान वयात मोठे नाव कमावले. 25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईत जन्मलेल्या दिव्या आज आपल्यासोबत असती, तर ती 47 वर्षांची असती. दिव्या आणि साजिद नाडियाडवाला यांच्या लग्नाच्या बातम्या खूप चर्चेत होत्या. दोघेही लवकरच संपूर्ण जगाला ही आनंदाची बातमी देणार होते. पण त्याच्या अगदी आधी घडलेल्या या अपघातात दिव्याने अगदी लहान वयातच या जगाचा निरोप घेतला. तिचा शेवटचा प्रवास अगदी तिच्या आयुष्याप्रमाणे होता. यावेळी दिव्याला सोन्याचे दागिने आणि नववधूप्रमाणे लाल चुनरीने सजवून निरोप देण्यात आला.

स्मिता पाटील

बॉलिवूड इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील  यांचीही शेवटची इच्छा होती की, जेव्हा त्या या जगाला निरोप देतील, तेव्हा आपल्याला अगदी नववधू प्रमाणे सजवण्यात यावे. स्मिता पाटीलचा मेकअप मॅन दीपक सावंतच्या मते, स्मिता बऱ्याचदा आईला सांगायची की, जेव्हाही माझा मृत्यू होइल, तेव्हा मला नववधूप्रमाणे नटून पाठव आणि त्यांच्या आयुष्यात अगदी तसेच घडले.

घनश्याम नायक

‘नट्टू काका’ फेम अभिनेते घनश्याम नायक यांनीही आपल्याला काम करता करता चेहऱ्यावर मेकअप असताना मृत्यू यावा अशी शेवटची इच्छा व्यक्त केली होती. शेवटच्या प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यात आली होती.

हेही वाचा :

Monalisa : मोनालिसाने नवरात्रीमध्ये पारंपारिक अवतारात जिंकली चाहत्यांची मनं, साध्या लूकवर चाहते घायाळ

Prabhas Highest Paid : प्रभास ठरला चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा अभिनेता, स्पिरिटसाठी घेतले 150 कोटी?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI