AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांच्याबाबतचा मोठा खुलासा; अरुणा ईराणी म्हणाल्या, ते सेटवर कधीच…

अरुणा ईराणी यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या लिजंडसोबत काम केलं आहे. यावेळी या तिघांशी त्यांचं बाँडिंग कसं होतं? कुणाचा स्वभाव कसा होता आणि आता य अभिनेत्यांमध्ये काय बदल झालाय यावर अरुणा ईराणी यांनी भाष्य केलं आहे.

अमिताभ बच्चन यांच्याबाबतचा मोठा खुलासा; अरुणा ईराणी म्हणाल्या, ते सेटवर कधीच...
Amitabh BachchanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 08, 2024 | 8:59 PM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा ईराणी या त्यांच्या अभिनयाच्या वेगळ्या शैलीने आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकेने आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यांनी त्याकाळात आयटम नंबरही केला होता. त्या काळातील जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलंय. या सर्व कलाकारांचं वागणं, बोलणं चालणं आणि स्वभाव अरुणा यांना माहीत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबाबत सर्वात मोठा खुलासा केला आहे. अमिताभ यांच्या स्वभावावरच त्यांनी बोट ठेवलं आहे.

अरुणा ईराणी यांनी राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम केलंय. त्यांची राजेश खन्नासोबत चांगली मैत्री होती. पण अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत कधी चांगली बाँडिंग राहिली नाही. एका मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलंय. राजेश खन्ना चांगले कलाकार होते. त्यांचं आणि माझं चांगलं जमायचं. त्यांना लोक घाबरायचे. पण मी त्यांना घाबरत नव्हते. ते मला बेन म्हणायेच. ऐ बेन चल जेवण करू, वेळ झालीय, असं ते नेहमी म्हणायचे, असं अरुणा ईराणी यांनी सांगितलं.

ते आणि त्यांची खोली

यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या स्वभावाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. अमिताभ बच्चन सुरुवातीपासूनच वेगळे राहायचे. अमिताभ सेटवर कधीच कुणाशी मिसळलेले दिसले नाहीत. ते आपल्या रूममध्ये किंवा वॅनिटी व्हॅनमध्ये वेळ घालवायचे. त्यांना कुणासोबत फ्रेंडली झालेलं पाहिलं नाही, असं अरुणा ईराणी म्हणाल्या.

त्यांच्याशी कधीच मैत्री झाली नाही

शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत माझी कधी मैत्री झाली नाही. पण आम्ही कधी कधी बोलायचो, असं त्या म्हणाल्या. अभिनेत्रींसोबत माझं चांगलं जमायचं. त्या मला का पसंत करायच्या हे मला माहीत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसऱ्या एका मुलाखतीत अरुणा ईराणी यांनी अमिताभ यांच्याबद्दलची एक माहिती शेअर केली होती. अमिताभ हे अत्यंत शिष्टाचार पाळणारे व्यक्ती आहे. ते कितीही बिझी असू देत ते कॉल करतात. अभिनेता म्हणून ते लिजेंड आहेत. जेव्हा मी त्यांच्यासोबत बॉम्बे टू गोवामध्ये काम केलं होतं, तेव्हा ते प्रसिद्ध नव्हते. त्यांनी आतापर्यंत एवढं प्रचंड काम केलंय. पण ते अजूनही तसेच आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा अहंकार नाहीये, असं अरुणा यांनी म्हटलं होतं. मी जर अमिताभ यांच्या जागी असते तर माझ्या डोक्यात कधीच यश गेलं असतं. मला वाटतं अमिताभ यांची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही, असंही त्यांनी मोकळेपणाने सांगितलं होतं.

Follow Us
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट..
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट...
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील बैठकीत...