AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birthday Special : तापसी पन्नूच्या ‘या’ चित्रपटांनी समाजाला दिला सल्ला, हे आहेत Must Watch चित्रपट

तापसीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथच्या चित्रपटांपासून केली आणि त्यानंतर ती मुंबईत आली. (Birthday Special : Bollywood Actress Taapsee Pannu's Must Watch movies)

Birthday Special : तापसी पन्नूच्या 'या' चित्रपटांनी समाजाला दिला सल्ला, हे आहेत Must Watch चित्रपट
| Edited By: | Updated on: Aug 01, 2021 | 11:09 AM
Share

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे, तिचा जन्म 1 ऑगस्ट 1987 रोजी दिल्लीत झाला होता. तापसी पन्नूनं तिच्या चित्रपटांद्वारे एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. तापसीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथच्या चित्रपटांपासून केली आणि त्यानंतर ती मुंबईत आली. तापसी तिचे आयुष्य अगदी सोप्या पद्धतीने जगते, तिचे आयुष्य खुल्या पुस्तकासारखं आहे असं म्हणायला हरकत नाही. तिच्या वाढदिवशी, आम्ही तिच्या स्त्रीभिमुख चित्रपटांबद्दल बोलणार आहोत. बॉलिवूडमध्ये खूप कमी अशा अभिनेत्री आहेत, ज्यांच्यासोबत दिग्दर्शक एक पूर्ण चित्रपट बनवतात, आजच्या युगात तापसी पन्नू अशी अभिनेत्री आहे जी एकट्या मुख्य भूमिकेतूनही चित्रपटाला शेवटपर्यंत नेण्यास सक्षम आहे.

नुकतंच, तापसी ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात दिसली, या चित्रपटात 2 नायक असूनही, तिनं तिच्या अभिनयानं सर्वांना आश्चर्यचकित केलं, या चित्रपटातही तिचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे.आणि यावर सतत चर्चा होत असते या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आल्या. तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांबद्दल बोलूया.

पुरुषप्रधान चित्रपटांनी बॉलिवूडवर कब्जा केला आहे, मात्र अभिनेत्री तापसी पन्नू आता तिच्या चित्रपटांसह आणि तिच्या अतुलनीय अभिनयासह स्पर्धा करण्यासाठी सतत प्रयत्न करते.

पिंक (2016)

Taapsee Pannu pink

पिंक चित्रपटात तापसी पन्नू अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना दिसली होती, या चित्रपटात असं दाखवण्यात आलं होतं की जी मुलगी पुरुषांसोबत सिगारेट ओढते किंवा लहान कपडे घालते ती मुलांसोबत काहीही करायला तयार असते असं नाही ” ती दारू पिते म्हणून तिची हत्या करण्यात आली, हा चित्रपट स्वतः शूजित सरकार यांनी लिहिला होता. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या पात्राबद्दल तापसी म्हणाली होती की, “माझ्यासाठी ही एक मोठी भूमिका होती, ती साकारताना मला वाटलं की मी आज करोडो लोकांचा आवाज बनली आहे.”

मनमर्जियां (2018)

Taapsee Pannu manmarziyaan

बॉलीवूडमध्ये यापूर्वी लव्ह ट्रँगलवर अनेक चित्रपट बनले आहेत, मात्र मनमर्जियानची कथा आजच्या कथेसारखीच आहे, या चित्रपटात आपल्याला तापसीसह विकी कौशल आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसले. या चित्रपटाच्या कथेमध्ये विकी आणि तापसी एकमेकांच्या प्रेमात आहेत, पण विकी अद्याप तापसीशी लग्न करायला तयार नाही. ही कथा आजच्या पिढीच्या कथेसारखी आहे. ज्यामुळे तापसी पन्नूनं अभिषेक बच्चनशी कुटुंबाच्या सांगण्यावरून लग्न केलं. मोठ्या शहरांमध्ये प्रेमाचा अर्थ कसा बदलला जातो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनाही आवडली. मुलीची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने दाखवलं की, शहरांतील मुलींचं मन कसं दुखावलं जातं आणि त्यांच्यावर कसा परिणाम होतो.

मुल्क (2018)

Taapsee Pannu Mulk

मुल्कमध्ये, तापसी पन्नू एका मुस्लिम कुटुंबासाठी वकिलाची भूमिका साकारत आहे, ज्याला देशद्रोही आणि दहशतवादी म्हणून संबोधलं गेलं आहे, या चित्रपटात तापसीनं एका वकिलाची भूमिका केली आहे, जिनं मुस्लिमशी लग्न केले आहे.  या चित्रपटाच्या कथेत, अभिनेत्रीला जो विषय दाखवायचा आहे, तो फक्त असं म्हणतो की एक कट्टर हिंदू आणि एक चांगला मुस्लिम होण्यापेक्षा एक चांगला माणूस असणे खूप चांगलं आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात आम्ही दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना तापसीसोबत पाहिले.

थप्पड़ (2020)

Taapsee Pannu Thappad

थप्पड चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर चित्रपटासंदर्भात अनेक प्रकारचे ट्रोल समोर आले. पण चित्रपटाची अभिनेत्री चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत उभी राहिली आणि तिनं सतत चित्रपटाला पाठिंबा दिला. या चित्रपटात एक स्त्री तिच्या सन्मानासाठी स्वतःसाठी कसा निर्णय घेते हे दाखवलं आहे. पतीचा अभिमान मोडून काढण्यासाठी तिला हा निर्णय घ्यावा लागतो, पतींचे जग आपला संसार बनवणाऱ्या बायकांना त्यांच्या सन्मानाची काळजी असावी, हे सर्व या उत्कृष्ट चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. (Birthday Special : Bollywood Actress Taapsee Pannu’s Must Watch movies)

संबंधित बातम्या

Gehana Vasisth : गेहना वशिष्ठचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाली अटक न करण्यासाठी केली 15 लाखांची मागणी

Khoya Khoya Chand | अवघ्या 8 वर्षांच्या कारकिर्दीनंतर ट्विंकल खन्नाने घेतला मनोरंजन विश्वाचा निरोप, कारण सांगताना म्हणाली…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.