AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif Net Worth | दमदार अभिनयासोबतच बक्कळ कमाई करते कतरिना कैफ, जाणून घ्या संपत्ती किती?

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. इतकेच नाही तर सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्येही कतरिनाचा समावेश आहे.

Katrina Kaif Net Worth | दमदार अभिनयासोबतच बक्कळ कमाई करते कतरिना कैफ, जाणून घ्या संपत्ती किती?
कतरिना कैफ
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 9:56 AM
Share

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. इतकेच नाही तर सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्येही कतरिनाचा समावेश आहे. बॉलिवूडमध्ये यशस्वी कामगिरीनंतर कतरिनाच्या कारकीर्दीचा आलेख मध्यभागीच कोसळू लागला होता. परंतु, त्यानंतर एका एकामागून एक शानदार अभिनय करून अभिनेत्रीने जबरदस्त पुनरागमन केले. कतरिनाची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे आणि यामुळेच बर्‍याच ब्रँडनी तिला साईन केले आहे.

चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त कतरिना बर्‍याच ब्रँड्सचे समर्थन करते. तर यातूनच ती बक्कळ कमाई देखील करते. कतरिना कैफ कोटींची मालकिण आहे. वेबसाइट कॅकनॉज डॉट कॉमच्या अहवालानुसार कतरिना कैफची एकूण मालमत्ता 148 कोटी आहे. अभिनेत्रीचे मासिक उत्पन्न आणि मानधन 1 कोटीहून अधिक आणि वर्षाकाठी जवळपास 12 कोटींपेक्षा अधिक आहे.

कतरिनाने चित्रपट, ब्रँड अ‍ॅन्डॉर्सेस, स्टेज शो आणि तिच्या मेक-अप ब्रँडमधून भरपूर कमाई केली आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्टच्या वृत्तानुसार कतरिना कैफ एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये घेते. याखेरीज स्लाईस, लक्स, ओप्पो, लॅकमे अशा बर्‍याच ब्रँड्सची ती काम करते. कतरिनाही रीबॉकशीही संबंधित आहे आणि त्यासाठी आता तिला पूर्वीपेक्षा 40 टक्के जास्त फी मिळत आहे.

कार

कतरिनाला लक्झरी वाहनांची खूप आवड आहे आणि तिच्याकडे ऑडी क्यू 3, ऑडी क्यू 7, मर्सिडीज एमएल 350 वाहने आहेत.

घर

मुंबईच्या वांद्रे भागामध्ये कतरिना कैफचा 3 बीएचके अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत 8.10 कोटी आहे. लोखंडवालामध्ये 13 कोटींची मालमत्ता आहे आणि वांद्रे येथील घरात सध्या ती राहत आहे. याशिवाय तिचे लंडनमध्ये 7 कोटींचे घर आहे.

आगामी प्रकल्प

कतरिना आता सूर्यवंशी, फोन भूत, आणि टायगर 3 या चित्रपटात दिसणार आहे. कतरिना आणि अक्षय कुमार सूर्यवंशीमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. कतरिना आणि अक्षयने बर्‍याचदा एकत्र काम केले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे रिलीज पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपटाची नवीन रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.

फोन भूत

फोन भूतमध्ये कतरिनासमवेत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे कतरिना प्रथमच ईशान आणि सिद्धांतसोबत काम करणार आहे. हा एक विनोदी चित्रपट असणार आहे.

टायगर 3

‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ नंतर आता कतरिना पुन्हा सलमान खानसमवेत या फ्रेंचायझीच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान आणि कतरिनाशिवाय इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत आहे.

(Bollywood Actress Katrina Kaif Net Worth)

हेही वाचा :

Rahul Disha Wedding : विवाह बंधनात अडकले दिशा परमार-राहुल वैद्य, पाहा लग्नसोहळ्याचे काही खास क्षण…

Kareena Kapoor | ‘तैमूरचं डायपर देखील बदलता येत नव्हतं’, ‘परफेक्ट’ आई होण्याबद्दल सांगताना करीना कपूर म्हणते…

ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.