AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असाही एक चित्रपट… त्यानंतर संजय दत्त आणि ऐश्वर्या रॉय कधीच एकत्र आले नाही, 21 वर्ष…

बॉलिवूडचे दिग्गज कलाकार संजय दत्त आणि ऐश्वर्या राय यांनी 'शब्द' आणि 'हम किसी से कम नहीं' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. दुर्दैवाने, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटले. परिणामी, गेल्या 21 वर्षांपासून कोणत्याही निर्मात्याने या दोघांना पुन्हा एकत्र पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला नाही.

असाही एक चित्रपट... त्यानंतर संजय दत्त आणि ऐश्वर्या रॉय कधीच एकत्र आले नाही, 21 वर्ष...
sanjay dutt aishwarya raiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 05, 2026 | 7:06 PM
Share

अभिनेता संजय दत्त आणि ऐश्वर्या रॉय या दोघांनीही बॉलिवूडमध्ये आपलं आढळ स्थान निर्माण केलं आहे. दोघांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. दोघांचेही करोडो चाहते आहेत. त्यांचा सिनेमा येताच तो पाहण्यासाठी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या उड्या पडत असतात. संजय दत्त तर बॉलिवूडमध्ये गेल्या 45 वर्षापासून काम करत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्या आणि संजूबाबाने एकत्र एका सिनेमात कामही केलं होतं. पण त्यांचा हा सिनेमा एवढा जोरात आपटला की त्यानंतर कोणत्याही निर्मात्याने या दोघांना घेऊन सिनेमा बनवला नाही. दोघांच्याही कारकिर्दीतील एकत्र काम करण्याचा हा शेवटचा सिनेमा ठरला आहे. आज या गोष्टीला 21 वर्ष पूर्ण झाले आहेत.

संजय दत्तने 1981 मध्ये रॉकी या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तर ऐश्वर्या रॉयने 1997मध्ये इरुवर या तमिल सिनेमातून फिल्मी दुनियेत दस्तक दिली होती. ऐश्वर्याने तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला संजय दत्त सोबत स्क्रिन शेअर केली होती. हे दोघेही हम किसी से कम नही या सिनेमाद्वारे एकत्र आले होते. त्यानंतर या दोघांनी शब्द नावाच्या सिनेमात काम केलं होतं. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सणकून आपटले होते. त्यानंतर या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही.

शेवटचा सिनेमा

2005मध्ये या जोडगळीचा शब्द हा सिनेमा आला होता. या सिनेमात दोघांनीही इंटिमेट सीन दिले होते. त्याची चर्चाही झाली होती. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला काही उतरला नाही. त्यामुळे हा सिनेमा जोरदार आपटला.

बजटही नाही निघाला

21 वर्षापूर्वी आलेला शब्द हा सिनेमा रोमांटिक ड्रामा होता. लीना यादवचं दिग्दर्शन होतं. या सिनेमात अभिनेता जायद खानही मुख्य भूमिकेत होता. त्याशिवाय आकाश पांडे, रुचा पाठक, सादिया सिद्दीकी, कामिनी खन्ना आणि बृजेंद्र कालाही या सिनेमात होते. पण या सिनेमाने आहे तो बजेटही काढला नाही. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला होता. त्यानंतर या दोघांना घेऊन कोणत्याच निर्मात्याने सिनेमा बनवण्याचं धाडस केलं नाही.

दरम्यान, ऐश्वर्या राय सध्या कोणत्याही प्रोजेक्टवर काम करत नाहीये. तिने 2023मध्ये पोन्नियिन सेलवन-2 या सिनेमात शेवटचं काम केलं होतं. तर, संजय दत्तने रितेश देशमुखच्या नुकत्याच आलेल्या राजा शिवाजी सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात त्याने अफजल खानची भूमिका साकारली आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स