Happy Birthday Helen | वयाच्या 19व्या वर्षी कारकिर्दीची सुरुवात, हेलनच्या नृत्य अन् सौंदर्याने मोहित झाले सलीम खान!

आज अभिनेत्री हेलन (Helen) यांचा 83वा वाढदिवस आहे. अभिनेत्रीने 50 आणि 60च्या दशकात आपल्या आयटम गाण्यांनी खळबळ उडवून दिली होती. आपल्या मनमोहक अदांनी सर्वाना वेड लावले होते.

Happy Birthday Helen | वयाच्या 19व्या वर्षी कारकिर्दीची सुरुवात, हेलनच्या नृत्य अन् सौंदर्याने मोहित झाले सलीम खान!
Helen
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Nov 21, 2021 | 8:00 AM

मुंबई : आज अभिनेत्री हेलन (Helen) यांचा 83वा वाढदिवस आहे. अभिनेत्रीने 50 आणि 60च्या दशकात आपल्या आयटम गाण्यांनी खळबळ उडवून दिली होती. आपल्या मनमोहक अदांनी सर्वाना वेड लावले होते. 19 वर्षांच्या हेलन स्टेजवर येताच सर्वांच्या नजरा आपोआप खिळायच्या. त्यांच्या नृत्यात लालित्य आणि उत्साह होता. त्याकाळात प्रत्येक चित्रपटात त्यांचा डान्स असणं गरजेचं होतं. चित्रपटात त्यांचा डान्स पाहण्यासाठी लोक आतुर असायचे. आपल्या नृत्याने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या हेलनच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी जाणून घेतल्यास, तुम्हाला आनंद होईल. चला तर, मग जाणून घेऊया तिच्या संघर्षमय जीवनातून हेलनने चित्रपटसृष्टीत कसा प्रवेश केला.

21 नोव्हेंबर 1938 रोजी म्यानमार बर्मामध्ये जन्मलेल्या हेलन यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. बॉलिवूड अभिनेत्रीसाठी हा प्रवास कठीण होता. हेलन या मूळच्या म्यानमार बर्माच्या आहेत. त्या अँग्लो इंडियन कुटुंबातील आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर हेलनच्या आईने एका ब्रिटिश सैनिकाशी लग्न केले. पण दुसऱ्या महायुद्धात त्यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर हेलन आईसह मुंबईला आल्या.

अशाप्रकारे आल्या मनोरंजन विश्वात!

हेलनच्या आईने कोलकात्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी परिचारिका म्हणून काम केले. पण आईच्या मिळकतीने कुटुंबाचा खर्च चालवणे कठीण जात होते. त्यानंतर हेलनने स्वतः काम करण्याचा विचार केला आणि तिची भेट कुक्कू मोरे यांच्याशी झाली. त्या चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्स करायच्या. त्यानंतर कुक्कूने हेलनला चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम मिळवून दिलं. आपल्या नृत्य आणि प्रतिभेने वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी हेलनने ‘हावडा ब्रिज’ या चित्रपटातील आयटम साँगने डान्स केला आणि बॉलिवूडची पहिल्या आयटम गर्ल बनल्या.

पहिल्या लग्नानंतर ओढवली कठीण परिस्थिती

1957 मध्ये हेलन यांनी आपल्यापेक्षा 27 वर्षांनी मोठे दिग्दर्शक पीएन अरोरासोबत लग्न केले होते, पण लग्नाच्या 18 वर्षानंतर 1974 मध्ये हेलन यांनी पती पीएन अरोरा यांना घटस्फोट दिला. हेलन यांच्या घटस्फोटाचे कारण होते आर्थिक फसवणूक. त्‍यामुळे त्यांना व्‍यक्‍तिगत जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आणि काही काळानंतर आर्थिक परिस्थिती बिघडल्‍यामुळे त्यांचा बंगलाही सील झाला आणि त्या अक्षरशः रस्त्यावर आल्या.

सलीम खान यांच्या प्रेमामुळे बांधली लग्नगाठ

‘काबिल खान’ या चित्रपटादरम्यान हेलन यांची सलीम खान यांच्याशी भेट झाली. बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या दिवसांपासून हेलन आपल्या सौंदर्याने लोकांना वेड लावत होत्या. मात्र, सलीम खान त्यांच्या नृत्यावर देखील भाळले आणि पहिले लग्न झाले असूनही सलीम यांनी हेलन यांच्याशी लग्न केले.

हेही वाचा :

इतिहास पुन्हा जिवंत होणार! ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत पाहायला मिळणार पावनखिंड लढाई!

‘गालावर खळी डोळ्यांत धुंदी…’, ‘विंक गर्ल’ प्रिया वारियरचा मराठमोळा लूक पाहिलात का?

Lal Singh Chaddha | अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें