AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Milind Soman | मॉडेलिंगमधून मिळवली भरपूर प्रसिद्धी, या वयातही सुपरफिट दिसतो मिलिंद सोमण!

अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) अशा लोकांपैकी एक आहे, ज्यांच्या वय अगदीच एका जागी थांबल्यासारखे वाटते. 'मेड इन इंडिया' या गाण्यापासून मिलिंद अनेक लोकांचा क्रश बनला आहे आणि आता वयाच्या 56​​व्या वर्षीही तो इतका तंदुरुस्त आणि परिपूर्ण आहे की, तो त्याच्या चाहत्यांना खूप प्रेरित करू शकतो.

Happy Birthday Milind Soman | मॉडेलिंगमधून मिळवली भरपूर प्रसिद्धी, या वयातही सुपरफिट दिसतो मिलिंद सोमण!
Milind Soman
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 9:07 AM
Share

मुंबई : अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) अशा लोकांपैकी एक आहे, ज्यांच्या वय अगदीच एका जागी थांबल्यासारखे वाटते. ‘मेड इन इंडिया’ या गाण्यापासून मिलिंद अनेक लोकांचा क्रश बनला आहे आणि आता वयाच्या 56​​व्या वर्षीही तो इतका तंदुरुस्त आणि परिपूर्ण आहे की, तो त्याच्या चाहत्यांना खूप प्रेरित करू शकतो.

मिलिंद सोमणला ‘आयर्न मॅन ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळखले जाते. 4 नोव्हेंबरला मिलिंद सोमण आपला वाढदिवस साजरा करतो. याच निमित्ताने आपण आज त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत…

स्कॉटलंडहून मुंबईत स्थायिक झाले कुटुंब

मिलिंदचा जन्म ग्लासगो, स्कॉटलंड येथे झाला. यानंतर मिलिंदचे कुटुंब लंडनजवळील एका ठिकाणी शिफ्ट झाले. मिलिंद 1972 मध्येच भारतात आला आणि त्याला इथे जुळवून घेताना खूप त्रास झाला कारण तो सुरुवातीला ब्रिटिश इंग्रजी बोलत होता.

मिलिंदबद्दल कदाचित एक गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, पण मिलिंद 10 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला शिस्त शिकवण्यासाठी RSS चा भाग बनवले होते.

इंजिनियर होऊन बनला मॉडेल

मिलिंदला 1988मध्ये मॉडेलिंगची पहिली संधी मिळाली. त्यावेळी तो इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा करत होता. तोपर्यंत मिलिंदला माहित नव्हते की, अशा प्रकारे मॉडेलिंग करूनही पैसे कमावता येतात. मिलिंद सोमणने ती ऑफर स्वीकारली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

मिलिंद सोमण 1988 पासून मॉडेलिंग करत होते, पण त्यांना असा प्रोजेक्ट मिळाला की ते रातोरात प्रसिद्ध झाले. हा प्रकल्प होता अलिशा चिनॉयचा ‘मेड इन इंडिया’ व्हिडिओ. हा 1995 म्युझिक व्हिडिओ इतका हिट झाला की, मिलिंद सोमण संपूर्ण भारताचा क्रश बनला आणि त्याचे अनेक चाहते बनत गेले.

मिलिंदने मधु सप्रेसोबत टफ शूजची जाहिरात केली होती. 1995मध्ये मुंबई पोलिसांनी या जाहिरातीविरोधात गुन्हा दाखल केला होता. या जाहिरातीत दोन्ही मॉडेल न्यूड असून, त्यांच्याभोवती साप गुंडाळण्यात आला होता. या फोटोने खळबळ माजवली आणि 14 वर्षे त्याविरोधात न्यायालयीन खटला चालला.

‘कॅप्टन व्योम’ बनून जिंकले मन

त्यानंतर मिलिंद सोमणने ‘कॅप्टन व्योम’ नावाच्या सायन्स फिक्शन शोमध्ये काम केले. 1998-1999 मध्ये हा शो खूप प्रसिद्ध झाला आणि मिलिंदची फॅन फॉलोइंग खूप वाढली होती.

2002 मध्ये आलेल्या ‘अग्निवर्ष’ चित्रपटात मिलिंदने ‘आर्यवसू’ची भूमिका साकारली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला, पण मिलिंदची उपस्थिती लोकांच्या लक्षात आली आणि त्या भूमिकेत त्याचा निरागसपणा दिसला. यानंतर मिलिंदने ’16 डिसेंबर’, ‘नियम’, ‘भरम’, ‘सलाम इंडिया’, ‘भेजा फ्राय’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

वैयक्तिक आयुष्य

मिलिंद सोमणला 2006 मध्ये ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ या चित्रपटात भूमिका मिळाली. हा एक फ्रेंच-जर्मन-भारतीय चित्रपट होता आणि या चित्रपटात तो ‘जालान’ ही व्यक्तिरेखा साकारत होता. मोठ्या केसांचा मिलिंदचा लूक अनेकांना आवडला होता आणि लोकांना काही समजण्याआधीच मिलिंदने 2006मध्ये त्याची सहकलाकार आणि फ्रेंच अभिनेत्री मायलीन झाम्पाओनीशी लग्न केले. तथापि, त्यांनी 2008 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि 2009 मध्ये अधिकृतपणे घटस्फोट घेतला. यानंतर मिलिंदने अंकिता कोंवरशी लग्नगाठ बांधली.

हेही वाचा :

Major | ‘देशाला सांभाळणं सैनिकाची जबाबदारी आहे!’, पाहा शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची कथा सांगणारा ‘मेजर’चा जबरदस्त टीझर!

Lookalike : चाहत्यांना सापडली आलिया भट्टची ड्युप्लिकेट, फोटो पाहून ओळखणं होईल कठीण

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.