Happy Birthday Naseeruddin Shah | केवळ 2 शर्ट वापरून नसीरुद्दीन शाहंनी पूर्ण केलं होतं चित्रपटाचं चित्रीकरण, जाणून घ्या कारण

बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट प्रतिभा आहेत. गेल्या 5 दशकांपासून त्यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

Happy Birthday Naseeruddin Shah | केवळ 2 शर्ट वापरून नसीरुद्दीन शाहंनी पूर्ण केलं होतं चित्रपटाचं चित्रीकरण, जाणून घ्या कारण
नसीरुद्दीन शाह
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 11:02 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट प्रतिभा आहेत. गेल्या 5 दशकांपासून त्यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नसीरुद्दीन शाह यांचा जन्म 20 जुलै 1950 रोजी यू.पी. मधील बाराबंकी जिल्ह्यात झाला. आज त्यांचा वाढदिवस आहे. नसीरुद्दीन शाह यांनी 1975 च्या ‘निशांत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रत्येकाची बोलती बंद केली होती. आज आपण त्याच्या ‘कथा’ या चित्रपटाविषयी बोलणार आहोत.

या चित्रपटात सगळ्यांनीच नसीरुद्दीन शाहंचा सहज सोपा अभिनय पहिला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत फारूक शेख आणि दीप्ती नवल देखील होते. असे म्हणतात की, या चित्रपटात जिथे चित्रपटाच्या संपूर्ण कास्टला एकाहून एक सुंदर कपडे घालायला दिले गेले होते. परंतु, संपूर्ण चित्रपटात नसीरुद्दीन शाहंच्या व्यक्तिरेखेला केवळ 2 पांढरे शर्ट देण्यात आले होते. ते परिधान करून त्यांनी संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण केले.

चाळीत राहणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य

नसीरुद्दीन शाह यांचा ‘कथा’ हा चित्रपट 1983 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील नसीरुद्दीन आणि फारुख शेख यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. हा चित्रपट मुंबईत राहणार्‍या ‘राजाराम जोशी’ (नसरुद्दीन शाह) याची कथा होती. या चित्रपटात तो मुंबईतील चाळीत राहणारा व्यक्ती होता. या चित्रपटात वासुदेव (फारुख शेख) यांच्या एन्ट्रीचा सीनही आश्चर्यकारक आहे. ज्यात चाळीत राहणाऱ्या लोकांचे जीवन जवळून दाखवले गेले आहे.

या चित्रपटात स्वत: नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले आहे की, त्यांनी या संपूर्ण चित्रपटात फक्त 2 शर्ट घातले आहेत. या चित्रपटात ते एका साध्या माणसाची भूमिका साकारत आहे. दुसरीकडे या चित्रपटात फारूक शेख बहिऱ्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. जिथे तो नसीरुद्दीन शाहची गर्लफ्रेंड संध्या (दीप्ती नवल) यांना सापळा रचून तिच्याशी लग्न न करता पळून जातो.

नसीरुद्दीन शाह यांचे काही चित्रपट खूप खास आहेत. नसीरुद्दीन शाहंच्या अभिनयामध्ये जादू आहे. ते इतरांपेक्षा खूप भिन्न आहेत. त्यांची विचार करण्याची पद्धत देखील पूर्णपणे भिन्न आहे.

धर्मावर विश्वास नसणारे नसीरुद्दीन शाह

नसीरुद्दीन शाह यांनी शबाना आझमी यांच्यासोबत ‘पार’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी डुकरांच्या एक कळपासोबत सीन केला होता. मुस्लिम धर्मात डुकरांना ‘हराम’ समजले जाते. नसीरुद्दीन शाहचा ‘पार’ हा चित्रपट 1984 मध्ये प्रदर्शित झाला होता. हे पात्र साकारताना त्यांनी म्हटले होते की, एखाद्या कलाकाराला कोणताही धर्म नसतो.

नसीरुद्दीन शाहचा नवा लूक

नसीरुद्दीन शाह अजूनही चित्रपटांमध्ये काम करतात. ते सतत काही नवीन मुलांच्या शॉर्ट फिल्ममध्येही काम करतात. नवीन मुलांच्या चित्रपटांमध्ये काम करताना अभिनेते कधीही पैशाबद्दल बोलत नाहीत. फारच थोड्या लोकांना माहिती आहे की नसीरुद्दीन शाह यांना मोबाईल आवडत नाही. ज्यामुळे तो लोक किंवा नवीन संचालकांशी फक्त ई-मेलद्वारे बोलतात.

(Happy Birthday Naseeruddin Shah actor only 2 shirts for katha film)

हेही वाचा :

The Kapil Sharma Show | प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘कप्पू की टोली’ पुन्हा तयार! ‘कपिल शर्मा’ शोमध्ये नव्या चेहऱ्याची एंट्री!

अभिनेत्रीच नव्हे कवयित्री देखील! प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.