Emergency |कंगना रानाैतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे महत्वाच्या भूमिकेत, पाहा चित्रपटाचे तिसरे पोस्टर…

आजतकला बोलताना श्रेयस म्हणाला की, सकाळी जेव्हा मी हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. खरंतर मी अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार आहे याची कोणालाच भनक नव्हती. लोकांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत.

Emergency |कंगना रानाैतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे महत्वाच्या भूमिकेत, पाहा चित्रपटाचे तिसरे पोस्टर...
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 9:07 AM

मुंबई : कंगना रानाैतचा (Kangana Ranaut) आगामी चित्रपट इमर्जन्सीची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झालायं. आता चित्रपटाचे तिसरे पोस्टर लाँच (Poster launch) करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या (Atal Bihari Vajpayee) भूमिकेत दिसत आहे. श्रेयसला अटलबिहारींच्या भूमिकेत पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. कारण यापूर्वी कोणालाही कल्पना नव्हती की, श्रेयस कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटामध्ये अटल बिहारींचा रोल करणार आहे. मात्र, या तिसऱ्या पोस्टरनंतर श्रेयसला चित्रपटामध्ये बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत श्रेयशने दिली चाहत्यांना माहिती

आजतकला बोलताना श्रेयस म्हणाला की, सकाळी जेव्हा मी हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. खरंतर मी अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार आहे याची कोणालाच भनक नव्हती. लोकांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत. चित्रपटात श्रेयस हा आणीबाणीच्या काळातील तरुण अटलबिहारी बनला आहे, जो राजकारणात आपला ठसा उमटवण्यासाठी धडपडत करताना दिसणार आहे.

हे सुद्धा वाचा

कंगनाने श्रेयशला फोन करत दिली चित्रपटाची आॅफर

श्रेयसने सांगितले की, मला कंगनाचा फोन आला होता. ती म्हणाली की ती इमर्जन्सी चित्रपट करत आहे, त्या संदर्भात तिला मला भेटायचे आहे. आम्ही भेटलो आणि मला चित्रपटाची संपूर्ण स्टोरी सांगण्यात आली. यावेळी मला विचारणा करण्यात आली की, तू अटलजींची भूमिका साकारशील का. यादरम्यान कंगनाने मला अटलजींच्या लहान वयातील काही फोटो दाखवले. त्यांची ऑफर ऐकून, मी सुरुवातीला दोन मिनिटे गप्प बसलो कारण मला धक्का बसला आणि आश्चर्य वाटले की मला अटलजींसाठी ऑफर का देण्यात आली, अटलजींचे पात्र साकारणे आव्हानात्मक आहे. ते एक आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व होते. राजकारणी असण्यासोबतच ते कवीही आहेत.

इमर्जन्सी चित्रपटात कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत

इमर्जन्सी चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यानंतर कंगनाचे खूप कौतुक केले जात आहे. मात्र, या चित्रपटातून गांधी आणि नेहरू घराण्याला बदनाम केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कंगना आणि वाद हे समिकारण नवे नाहीयं. मात्र, आता या चित्रपटात श्रेयशही महत्वाच्या भूमिकेत असल्याने चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.