Kareena Kapoor Khan : ‘करीना कपूरच्या चाहत्यांना मदर्स डेचं खास गिफ्ट’ पहिल्यांदाच लहान मुलाचा फोटो शेअर

त्यातच करीना कपूर खाननं मदर्स डेच्या निमित्ताचं चाहत्यांना खास भेट दिली आहे. (Kareena Kapoor Khan: 'Special Mother's Day Gift to Kareena Kapoor Khan's Fans)

Kareena Kapoor Khan : ‘करीना कपूरच्या चाहत्यांना मदर्स डेचं खास गिफ्ट’ पहिल्यांदाच लहान मुलाचा फोटो शेअर

मुंबई : आज सर्वत्र मदर्स डेचं (Mother’s Day) सेलिब्रेशन होताना दिसतंय. अनेक कलाकार आपल्या आईसोबत फोटो शेअर करत तिला शुभेच्छा देत आहेत. अशात काही कलाकारांनी आपल्या मुलांचे फोटो शेअर केले आहेत. त्यातच करीना कपूर खाननं (Kareena Kapoor Khan) मदर्स डेच्या निमित्ताचं चाहत्यांना खूप खास भेट दिली आहे.

तैमूरसोबतच लहान बाळाचा फोटो शेअर

करीनानं मदर्स डेच्या दिवशी तैमूरसोबत आपल्या लहान मुलाचा पहिला फोटो शेअर केला आहे. गेले अनेक दिवस तिच्या चाहत्यांना लहान बाळाला बघण्याची उत्सुकता होती. चाहते तिच्या बाळाच्या फोटोची किंवा झलक मिळण्याची वाट बघच होते. मात्र तिनं कोणताही फोटो शेअर केला नव्हता. मात्र आता चाहत्यांची ही इच्छा शेवटी मदर्स डेच्या या खास प्रसंगी पूर्ण झाली आहे.

पाहा करीना कपूरची स्पेशल पोस्ट

हे दोघं मला चांगल्या भविष्याची आशा देतात…

आपल्या दोन्ही मुलांचे फोटो शेअर करत करीनानं हे दोघं आपल्या आयुष्यातील आशेचा किरण आहेत अशं सांगितलं आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत करीनानं लिहिलं, ‘आज संपूर्ण जग आशेवर अवलंबून आहे, हे दोघं मला चांगल्या भविष्याची आशा देतात. सर्वांना, सुंदर मातांना मातृ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.’ करीनाच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. चाहत्यांना तिची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात आवडलीये.

फेब्रुवारी महिन्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) या जोडीला पुन्हा एकदा पुत्ररत्न प्राप्ती झालं. करीना कपूर खानने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिला. यापूर्वी करीनाला तैमूर आली खान नावाचा एक मुलगा आहे. करीनाने आतापर्यंत आपल्या धाकट्या मुलाला मीडियापासून पूर्णपणे दूर ठेवले होते. अशा परिस्थितीत आता करीनाच्या चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे

संबंधित बातम्या

Photo : ‘मेरी माँ…’ मराठमोळ्या कलाकारांचं ‘मदर्स डे’ सेलिब्रेशन, शेअर केले खास फोटो

Photo : अभिनेत्री प्रीती झिंटा विमानतळावर स्पॉट, अमेरिकेसाठी रवाना