Khoya Khoya Chand | काजोलची बहीण असूनही इंडस्ट्रीत नाही कमावता आले नाव, पहा आता काय करतेय तनिषा मुखर्जी…

तनिषाने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘Sshh’ या चित्रपटापासून केली होती. या चित्रपटात तनिषासमवेत अभिनेता डिनो मोरेया मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकला नाही.

Khoya Khoya Chand | काजोलची बहीण असूनही इंडस्ट्रीत नाही कमावता आले नाव, पहा आता काय करतेय तनिषा मुखर्जी...
तनिषा मुखर्जी
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 11:10 AM

मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा (Tanuja) यांनी आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकले. तनुजानंतर तिची मोठी मुलगी काजोलनेही (Kajol) बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. काजोलनंतर तिची धाकटी बहीण तनिषा मुखर्जीने (Tanisha Mukherjee) बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, पण तिला आपला ठसा उमटवता आला नाही.

तनिषाने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘Sshh’ या चित्रपटापासून केली होती. या चित्रपटात तनिषासमवेत अभिनेता डिनो मोरेया मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकला नाही. त्यानंतर राम गोपाल वर्माच्या ‘सरकार’मध्ये तनिषा दिसली, या चित्रपटात तनिषासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसले होते. ‘सरकार’ हिट झाल्यानंतर ती ‘नील अँड निक्की’मध्ये उदय चोप्रासोबत दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तनिषाने तिच्या बॉलिवूड कारकीर्दीत 11 चित्रपटांमध्ये काम केले. पण, ती तिच्या आई आणि बहिणीप्रमाणे हिट ठरली नाही.

रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली

चित्रपटांपासून लांब गेल्यानंतर तनिषाने टीव्हीच्या जगात पाऊल ठेवले. ती ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली. या शोमध्ये प्रवेश केल्यानंतर ती काही काळ चर्चेत होती. बिग बॉसनंतर पुन्हा तनिषा मुखर्जी प्रसिद्धी झोतापासून दूर गेली. या शोमधील तनिषा आणि अरमान कोहलीची जवळीक चर्चेचा एक भाग बनली होती. चर्चेत राहिल्यानंतरही तनिषाच्या कारकिर्दीवर काहीच परिणाम झाला नाही.

‘या’ कारणामुळे पुन्हा चर्चेत

तनिषा मुखर्जी नुकतीच पुन्हा एकदा चर्चेत आली होती. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, वयाच्या 39व्या वर्षी तिने एग्ज फ्रीज करून घेतले आहेत. तिने मुलाखतीत सांगितले होते की, वयाच्या 33व्या वर्षी तिला ही प्रक्रिया करायची होती, परंतु डॉक्टरांनी त्यास नकार दिला होता. त्यानंतर वयाच्या 39व्या वर्षी शेवटी तिने ही प्रक्रिया पूर्ण केली.

सध्या काय करते?

तनिषा मुखर्जीने आता स्वत:ला बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर केले आहे. नुकताच तिचा ‘लाईफ इज शॉर्ट’ हा लघुपट प्रदर्शित झाला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबद्दल माहिती दिली.

(Khoya Khoya Chand being Kajol’s sister Tanisha Mukherjee could not earn a name in the industry)

हेही वाचा :

पुन्हा एकदा रंगणार सत्तेचा डाव, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!  

Himachal Pradesh Trip : मिताली मयेकरची जुईली आणि नचिकेतबरोबर हिमाचल सफर, पाहा सुंदर फोटो

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.