Khoya Khoya Chand | ‘मोहब्बतें’मधून जिंकले चाहत्यांचे हृदय, आता भारत सोडून परदेशात स्थायिक झालाय जुगल हंसराज!

बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत बरेच नाव कमावले, परंतु ते अचानक पडद्यावरून गायब झाले. असाच एक अभिनेता म्हणजे जुगल हंसराज (Jugal Hansraj).

Khoya Khoya Chand | 'मोहब्बतें'मधून जिंकले चाहत्यांचे हृदय, आता भारत सोडून परदेशात स्थायिक झालाय जुगल हंसराज!
जुगल हंसराज
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 8:47 AM

मुंबई : बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत बरेच नाव कमावले, परंतु ते अचानक पडद्यावरून गायब झाले. असाच एक अभिनेता म्हणजे जुगल हंसराज (Jugal Hansraj). जुगलने आपल्या अभिनयाने आणि गोंडस चेहऱ्याने सर्वांना भुरळ घातली होती. जुगलने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा त्याच्या ‘चॉकलेट बॉय’ लूकने चाहत्यांना वेड लावले होते.

जुगलच्या लूकने आणि त्याच्या निळ्या डोळ्यांनी चाहत्यांच्या मनात घर केले होते. अभिनेत्याच्या ‘पापा केहते हैं’ चित्रपटाच्या गाण्यांची बरीच चर्चा रंगली. पण, तुम्हाला माहिती आहे का सध्या हा देखणा नायक कुठे आहे? चला तर जाणून घेऊया…

‘मासूम’ ने झाली करिअरची सुरुवात

जुगलने बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1983 मध्ये जुगल नसीरुद्दीन शाह यांच्या सुपरहिट चित्रपट मासूममध्ये बालकलाकार म्हणून दिसला होता. जुगलचा अभिनय आणि त्याच्या निरागसपणाने या चित्रपटाच्या चाहत्यांची मने जिंकली. ‘मासूम’च्या यशानंतर जुगल यांनी ‘सल्तनत’ आणि ‘कर्मा’ सारख्या चित्रपटात बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

मुख्य भूमिका सकारात मोठी एंट्री!

बालकलाकार म्हणून चाहत्यांमध्ये ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्याने 1994 साली ‘आ गले लग जा’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका सकारात पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रवेश केला. या चित्रपटानंतर जुगल ‘द डॉन’, ‘पापा केहते हैं’, ‘मोहब्बतें’, ‘हम प्यार तुम्हीसे कर बैठे’, ‘सलाम नमस्ते’, ‘प्यार इम्पॉसिबल’ या चित्रपटांमध्ये दिसला.

‘कुछ कुछ होता है’साठी गीतलेखन

चाहत्यांना हे माहितच नाही की, एक चांगला अभिनेता असण्याव्यतिरिक्त जुगलकडे आणखी कलागुण देखील आहेत. करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाच्या हिट टायटल ट्रॅकला जुगलने एक खास रूप दिले. असे म्हणतात की, जुगल हंसराजने या गाण्याच्या पहिल्या आठ ओळी दिल्या आणि त्याच बरोबर ‘कुछ कुछ होता है’ या गाण्याची ट्यून देखील दिली.

अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट

बाल कलाकार म्हणून जुगल यांना मिळालेले यश मुख्य भूमिका किंवा नायक म्हणून मिळू शकले नाही, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मात्र, अभिनेता अखेर विद्या बालनच्या ‘कहानी 2’मध्ये दिसला होता. या चित्रपटानंतर तो पुन्हा कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.

तो सध्या काय करतोय?

कारकीर्दीत जास्त यश न मिळाल्यामुळे त्याने स्वत:ला सिनेमा जगतापासून दूर केले आहे. आता अभिनेता आपल्या पत्नीसमवेत परदेशात राहतो. याबरोबरच आता तो लेखनावरही विशेष काम करत आहे. रिपोर्ट्सनुसार, जुगल आता करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊससाठी स्क्रिप्ट निवडण्याचे काम करत आहे.

(Khoya Khoya Chand Jugal Hansraj has won the hearts of fans from ‘Mohabbatein’, has now left India and settled abroad)

हेही वाचा :

राज कुंद्रा प्रकरणात अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव, आपला यात काहीच संबंध नसल्याचा फ्लोराचा दावा!

‘I DID NOT QUIT!!’, ‘तारक मेहता…’ सोडल्याच्या चर्चेवर ‘बबिता’ मुनमुन दत्ताची पहिली प्रतिक्रिया!

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.