Kangana Vs Kriti | कंगना आधी क्रितीने मारली बाजी, सर्वात आधी पडद्यावर साकारणार माता ‘सीता’ची भूमिका!

आजकाल बॉलिवूडमध्ये पौराणिक कथेवर चित्रपट बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘तान्हाजी’ फेम दिग्दर्शक ओम राऊत यांनी श्रीरामाचे जीवन मोठ्या पडद्यावर दाखवण्याची तयारी सुरु केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री क्रिती सॅनन देवी सीतेची भूमिका साकारत आहे.

Kangana Vs Kriti | कंगना आधी क्रितीने मारली बाजी, सर्वात आधी पडद्यावर साकारणार माता ‘सीता’ची भूमिका!
Kangana-Kriti
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 12:07 PM

मुंबई : आजकाल बॉलिवूडमध्ये पौराणिक कथेवर चित्रपट बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘तान्हाजी’ फेम दिग्दर्शक ओम राऊत यांनी श्रीरामाचे जीवन मोठ्या पडद्यावर दाखवण्याची तयारी सुरु केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री क्रिती सॅनन देवी सीतेची भूमिका साकारत आहे. त्याच वेळी, काही काळापूर्वी कंगना रनौतने देखील जाहीर केले की, ती देवी सीतेवरील चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहे.

जेव्हा दोन भिन्न अभिनेत्री एक पात्र साकारतात, तेव्हा तुलना होणे बंधनकारक असते. एकीकडे, क्रितीने तिच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, तर दुसरीकडे, कंगनाचा चित्रपट अजून शूटिंग सुरु होणे बाकी आहे. हे पाहून असे वाटते की, कंगना रनौतच्या आधी क्रिती सॅनन मोठ्या पडद्यावर देवी सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शकाने दिली माहिती!

चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक ओम राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सांगितले की, क्रिती सॅननने तिच्या भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे. ओम राऊतने काही फोटो पोस्ट केले आहेत, त्या फोटोंमध्ये क्रिती आणि ओम एकत्र केक कापताना दिसत आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर छान हास्य आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये ओम राऊतने लिहिले की, ‘प्रिय क्रिती, तुला जानकीची भूमिका साकारताना पाहणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही. तुमच्या भागाचे शूटिंग संपले यावर माझा विश्वास बसत नाही. मस्त प्रवास होता!!!’ त्याने क्रिती सॅननला आदिपुरुष हॅशटॅगसह टॅग केले आहे.

जानकीचे पात्र साकारत आहे क्रिती

क्रिती सॅनन ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात जानकीची अर्थात सीतेची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. ज्यात क्रिती माता सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे. एवढेच नाही तर, साऊथचा सुपरस्टार प्रभासही या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो ‘श्री रामा’ची भूमिका साकारत आहे. याशिवाय बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान खलनायक म्हणून दिसणार आहे. यामध्ये तो रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट खूप महागडा ठरणार आहे. हा खूप मोठ्या बजेटमध्ये बनवला जात आहे. चित्रपट पूर्ण होण्याआधीच त्यातील काही फोटोंनी आधीच सोशल मीडियावर बरेच मथळे बनवले आहेत. ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासच्या जोडीबरोबरच या चित्रपटाला आता संपूर्ण भारतात मान्यता मिळाली आहे. त्याचे शूटिंग अजून चालू आहे, पण क्रितीने तिचे काम पूर्ण केले आहे. आदिपुरुष पुढील वर्षी म्हणजेच 2022 रोजी 11 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. त्याचे अनेक पोस्टर्स आधीच रिलीज झाले आहेत. क्रिती याआधी ‘मिमी’ या चित्रपटात दिसली होती, त्या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

हेही वाचा :

प्रेक्षकांना आवडलाय विकी कौशलचा ‘सरदार उधम’, सोशल मीडियावर चाहते करतायत कौतुकाचा वर्षाव!

‘सूर्यवंशी’च्या प्रमोशनसाठी कतरिना कैफ पोहोचली ‘झी मराठी’च्या अवॉर्ड फंक्शनमध्ये, पाहा खास फोटो

Sardar Udham Review : विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, शूजित सरकारने पुन्हा एकदा हृदय जिंकले!

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.