AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir-Alia Wedding | रणबीर-आलिया लग्न यावर्षीच होणार म्हणणारी लारा दत्ता आता म्हणतेय….

नुकतीच अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) आपल्या एका मुलाखतीत रणबीर आणि आलियाच्या लग्नाविषयी बोलली होती. मात्र, आता अभिनेत्रीने या प्रकरणी तिचे स्पष्टीकरण दिले आहे. ती म्हणाली की, माझ्या वक्तव्याची अतिशयोक्ती करून ते चर्चिले गेले.

Ranbir-Alia Wedding | रणबीर-आलिया लग्न यावर्षीच होणार म्हणणारी लारा दत्ता आता म्हणतेय....
आलिया-रणबीर-लारा
| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 6:47 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. सध्या दोघेही एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतात. रणबीर आणि आलिया मीडियासमोरही एकत्र फोटो पोज देताना दिसतात. मात्र आता, दोघांचे लग्न कधी होणार याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. अशा परिस्थितीत नुकतीच अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) आपल्या एका मुलाखतीत रणबीर आणि आलियाच्या लग्नाविषयी बोलली होती.

मात्र, आता अभिनेत्रीने या प्रकरणी तिचे स्पष्टीकरण दिले आहे. ती म्हणाली की, माझ्या वक्तव्याची अतिशयोक्ती करून ते चर्चिले गेले. लारा म्हणाली, ‘मी कोणतीही भविष्यवाणी करणारी नाहीय की मी असं बोलेन. माध्यमांनी त्यांच्या मानतील शब्द आमच्या तोंडी टाकणे बंद करावे आणि अशा तथ्यहीन बातम्या देणे देखील बंद करावे.

नेमकं काय म्हणाली होती लारा?

वास्तविक, टाईम्स नाऊशी बोलताना लाराला बॉलिवूडमधील तरुण जोडप्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. लारा म्हणाली होती की, ती जुन्या पिढीतील असल्याने तिला माहित नाही की, आता कोण कोणाला डेट करत आहे. मात्र, तरीही ती म्हणाली की, कदाचित मी काही जोडप्याबद्दल सांगू शकतो पण मला माहित नाही की, ते आता एकत्र आहेत की नाही. जेव्हा, लाराला आलिया आणि रणबीरबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली होती की, ‘मला वाटते या वर्षी ते दोघे लग्न करतील.’

‘बेल बॉटम’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

लारा दत्ता लवकरच ‘बेल बॉटम’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात लारासोबत अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. लारा चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लाराचा लूक पाहून चाहते खूप प्रभावित झाले आहेत. लाराचा लूक आणि तिचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला आहे. लाराचे सोशल मीडियावर खूप कौतुक देखील होत आहे.

‘इंदिरा गांधी’ साकारण्याविषयी लारा म्हणते…

लारा दत्ताने एका मुलाखतीत सांगितले होते की, इंदिरा गांधींचे पात्र साकारणे तिच्यासाठी खूप कठीण होते. लारा म्हणाली की, ‘लुक टेस्ट दरम्यान मी स्वतःला आरशात पाहिल्यावर मला धक्का बसला. हा मेकअप तयार करण्यासाठी सकाळी तब्बल 3 तास लागायचे आणि नंतर संध्याकाळी तो काढताना जवळपास तासभर जायचा.’ ‘बेल बॉटम’ हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये ‘3 डी’ मध्ये प्रदर्शित होईल. कोरोनानंतर अक्षय कुमारचा हा पहिला चित्रपट आहे, जो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

(Lara Dutta clarifies her prediction about Ranbir Kapoor And Alia Bhatt Wedding)

हेही वाचा :

प्रियांका, कतरिना आणि आलिया, पहिल्यांदाच तीन अभिनेत्री जाणार रोड ट्रीपवर! 

‘फिरायला गेलो तरी नमाज चुकवणे नाही…’, सना खानने पतीसोबत विमानतळावरच अदा केली नमाज, व्हिडीओ चर्चेत!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.