Video | ‘फिरायला गेलो तरी नमाज चुकवणे नाही…’, सना खानने पतीसोबत विमानतळावरच अदा केली नमाज, व्हिडीओ चर्चेत!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 10, 2021 | 2:29 PM

सना खानने (Sana Khan) ग्लॅमर इंडस्ट्री सोडली असली तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहते. लग्नानंतर सनाने जाहीर केले होते की, ती यापुढे अभिनय करणार नाही. सध्या ती मालदीवमध्ये तिचा पती अनस सय्यदसोबत सुट्टीचा आनंद लुटत आहे.

Video | ‘फिरायला गेलो तरी नमाज चुकवणे नाही...’, सना खानने पतीसोबत विमानतळावरच अदा केली नमाज, व्हिडीओ चर्चेत!
सना खान

मुंबई : सना खानने (Sana Khan) ग्लॅमर इंडस्ट्री सोडली असली तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहते. लग्नानंतर सनाने जाहीर केले होते की, ती यापुढे अभिनय करणार नाही. सध्या ती मालदीवमध्ये तिचा पती अनस सय्यदसोबत सुट्टीचा आनंद लुटत आहे. सनाने तिथून अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एक व्हिडीओमध्ये हे दोघे पती-पत्नी विमानतळावर नमाज अदा करताना दिसले आहेत.

सन आणि अनस दोघे सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. कोरोना काळात परवानगी मिळाल्यानंतर दोघेही मालदीवला रवाना झाले आहेत. भारतातून मालदीवला जाईपर्यंतचा प्रवास तिने एका व्हिडीओत चित्रित केला आहे.

विमानतळावरचा अदा केली नमाज

कोविडमुळे बऱ्याच काळानंतर आपल्या पतीसोबत सुट्टी घालवण्यासाठी सना मालदीवला पोहोचली आहे. यावेळी विमानतळावर ती सर्व सुरक्षा खबरदारी घेताना दिसली. सना आपल्या व्हिडीओत सांगते की, ती या सहलीबद्दल किती आनंदी आहे. ती उडी मारते आणि थेट गाडीत बसते. यानंतर ती म्हणते की ‘आम्ही विमानतळावरच नमाज अदा केली. कारण फिरायला चाललो असलो तरी नमाज चुकवणे चांगले नाही’.

पाहा व्हिडीओ :

सुट्टीचा आनंद घेतय सना

यानंतर ती सी-प्लेनद्वारे मालदीवला रवाना झाली. सध्या ती तिथे वॉटर व्हिलामध्ये राहत आहे. ती तिच्या पतीसोबत या सुट्टीचा आनंद घेत आहे. यावेळी सना पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या बुरख्यामध्ये दिसत आहे. तर, तिच्या पतीने पांढरा कुर्ता पायजमा घातला आहे.

विश्रांतीचे काही क्षण

याशिवाय सानाने तिचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती बीचवर आराम करताना दिसत आहे. तिने सांगितले की, तिच्या पतीने तिचे हे फोटो क्लिक केले आहेत. यात तिने जांभळ्या रंगाचा बुरखा घातला आहे. ती अतिशय सहजतेने समुद्राकडे बघत आहे.

मनोरंजन विश्वाला अलविदा

‘बिग बॉस’ची उपविजेती आणि सलमान खानची सह-अभिनेत्री सना खानने (Sana Khan) आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ‘बिग बॉस’ गाजवल्यानंतर ती सलमानसह ‘जय हो’ या चित्रपटात झळकली होती. मात्र, ती मनोरंजन विश्व सोडणार असल्याचे कळताच तिच्या चाहत्यावर्गाला चांगलाच धक्का बसला होता. अभिनेत्री सना खानने चित्रपट सृष्टीला (Film Industry) ‘अलविदा’ म्हणत, धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला होता. सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहीत तिने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

(Sana Khan on Maldives Vacation mode actress offers Namaz at airport with husband anas)

हेही वाचा :

Bigg Boss OTT | ‘बिग बॉस’च्या आलिशान घरात जाताच बदलला ‘भोजपुरी क्वीन’ अक्षराचा लूक!

‘युवर मराठी अ‍ॅक्सेंट इस सो डिफ्रंट’ म्हणत ‘या’ मराठी तारकांनी दाखवला भाषेतील फरक, तुम्हाला माहितीयत का ‘हे’ शब्द?  

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI