Bigg Boss OTT | ‘बिग बॉस’च्या आलिशान घरात जाताच बदलला ‘भोजपुरी क्वीन’ अक्षराचा लूक!

अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshara Singh) बिग बॉस ओटीटीमध्ये (Bigg Boss OTT) भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीचे प्रतिनिधित्व करणार आहे. बिग बॉसच्या घरात घागरा चोलीमध्ये प्रवेश करणारी अक्षरा दुसऱ्याच दिवशी एका बोल्ड स्टाईलमध्ये दिसली.

1/6
अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshara Singh) बिग बॉस ओटीटीमध्ये (Bigg Boss OTT) भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीचे प्रतिनिधित्व करणार आहे. बिग बॉसच्या घरात घागरा चोलीमध्ये प्रवेश करणारी अक्षरा दुसऱ्याच दिवशी एका बोल्ड स्टाईलमध्ये दिसली. पिवळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि डेनिम शॉर्टमध्ये अक्षरा खूप सुंदर दिसत होती.

2/6
अक्षरा म्हणते की, जे लोक भोजपुरी लोकांकडे बोट दाखवत राहतात. मी त्यांच्याविरोधात भूमिका घेईन आणि त्यांना चोख प्रत्युत्तर देईन. अक्षरा म्हणाली की, तिला हे देखील जगाला कळावे की, भोजपुरी फिल्म इंडस्ट्री म्हणजे फक्त ‘लेहेंगा चोली’ नाही. या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुशिक्षित लोकही आहेत, जे चांगल्या कुटुंबातून आले आहेत.

3/6
अक्षरा बिग बॉसच्या घरात तिच्या फॅशनचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. अक्षरा म्हणाली की, बिग बॉस ओटीटीमध्ये प्रेक्षक तिला अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये पाहत आहेत, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.

4/6
बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर अक्षरा सिंहच्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये अक्षरा पूर्ण मेकअपसह खूप आनंदी दिसत होती. व्हिडीओमध्ये अक्षरा म्हणाली की, मी माझे कान पकडून माफी मागते की, मी तुम्हाला सांगू शकले नाही की, मी बिग बॉसमध्ये जात आहे. मला तुमच्याबरोबर सर्व काही शेअर करायचे होते, पण मी हे करू शकलो नाही. पण, आता मी इथे यूपी-बिहारची संस्कृती सादर करणार आहे, तर खूप प्रेम आणि आशीर्वाद नक्कीच मिळतील.

5/6
बिग बॉसमध्ये प्रवेश करताना अक्षरा सिंहने 'सावन में लग गई आग' या गाण्यावर जबरदस्त नृत्य सादर केले होते. अभिनेत्रीच्या शैलीने चाहत्यांना भुरळ घातली आहे. स्वतः शोचा होस्ट करण जोहरही अक्षराचा डान्स पाहून प्रभावित झाला. कोरिओग्राफर निशांत भट्ट यांनी अक्षराला भोजपुरी इंडस्ट्रीची 'आलिया भट्ट' म्हटले आहे.

6/6
या शोमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अक्षरा सिंहने कनेक्शन म्हणून करण नाथ आणि प्रतीक सहजपाल यांची निवड केली होती. या दोघांना अक्षरासोबत नृत्याचा टास्क देण्यात आला होता. यापैकी तिने प्रतिक सहजपालची कनेक्शन म्हणून निवड केली. आता बिग बॉसच्या घरात ती काय धमाल करते आणि ती किती दिवस ‘बीबी’च्या घरामध्ये राहते हे पाहावे लागेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI