Neetu Kapoor: “त्यांना सतत रडणारी विधवा पहायची होती, पण..”; ट्रोल करणाऱ्यांना नीतू कपूर यांचं सडेतोड उत्तर

'पतीच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करण्याऐवजी तुम्ही काय एंजॉय करताय', अशा शब्दांत लोकांना त्यांना ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगला (Trolling) नीतू कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

Neetu Kapoor: त्यांना सतत रडणारी विधवा पहायची होती, पण..; ट्रोल करणाऱ्यांना नीतू कपूर यांचं सडेतोड उत्तर
Neetu Kapoor and Rishi KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 4:40 PM

दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचं कॅन्सरने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर काही महिन्यांनी त्यांच्या पत्नी नीतू कपूर (Neetu Kapoor) या सोशल मीडियावर सक्रिय झाल्या होत्या. सोशल मीडियावर त्या विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतात. अनेकदा त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी टीका केल्या होत्या. ‘पतीच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करण्याऐवजी तुम्ही काय एंजॉय करताय’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगला (Trolling) नीतू कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे. त्याचप्रमाणे ट्रोल करणाऱ्यांना थेट ब्लॉक करत असल्याचं त्यांनी सांगितलं. “काही जण रडून स्वत:ला सावरतात तर काही हसून. मी माझ्या पतीला कधीच विसरू शकत नाही,” असंदेखील त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या नीतू कपूर?

‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मला आवडतं म्हणून मी ते करते. मी ते एंजॉय करते. मला माझे फॉलोअर्स आवडतात. जे मला ट्रोल करतात त्यांना मी सरळ ब्लॉक करते. अशी काही लोकं असतात जे म्हणायचे, ‘पतीचं निधन झालं आणि ही एंजॉय करतेय.’ त्यांना रडणारी विधवा पहायची होती. पण अशा लोकांना मी ब्लॉक करते. मी असं म्हणेन की मला असंच राहायचं आहे आणि मी अशीच राहीन. अशाच पद्धतीने मी दु:खातून सावरते. काही जण रडून स्वत:ला सावरतात तर काही हसून. मी माझ्या पतीला कधीच विसरू शकत नाही. ते माझ्यासोबत, माझ्या मुलांसोबत इथेच आहेत. आजही जेव्हा आम्ही एकत्र जेवायला बसतो, तेव्हा अर्धा वेळ आम्ही त्यांच्याबद्दलच बोलत असतो. अशाच पद्धतीने आम्ही त्यांची आठवण काढतो. रणबीरच्या स्क्रीनसेव्हरवर त्यांचा फोटो कायम असतो. पण त्यांची आठवण काढण्यासाठी आम्हाला दु:खी व्हायची गरज नाही. आम्ही त्यांच्या आठवणी साजरं करू शकतो. त्यांच्या आठवणींनी आमच्या चेहऱ्यावर हास्य येतं.”

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

नीतू कपूर या इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय असून त्यांचे जवळपास 18 लाख फॉलोअर्स आहेत. नीतू यांनी ऋषी कपूर यांच्याशी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना रिधिमा आणि रणबीर ही दोन मुलं आहेत. ऋषी कपूर यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. 2020 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.