Net Worth | नायक नाही तर खलनायक साकारल्यानंतर मिळाली प्रसिद्धी, पाहा एका चित्रपटासाठी किती मानधन आकारतो नील नितीन मुकेश..

अभिनेता नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh ) अशा एका कुटुंबातील आहे, ज्यांच्या अनेक पिढ्या चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. तो बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक कुटुंबातील आहे.

Net Worth | नायक नाही तर खलनायक साकारल्यानंतर मिळाली प्रसिद्धी, पाहा एका चित्रपटासाठी किती मानधन आकारतो नील नितीन मुकेश..
नील नितीन मुकेश
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 8:54 AM

मुंबई : अभिनेता नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh ) अशा एका कुटुंबातील आहे, ज्यांच्या अनेक पिढ्या चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. तो बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक कुटुंबातील आहे. नीलचे वडील नितीन आणि आजोबा मुकेश लोकप्रिय गायक आहेत. मात्र, नीलला वडील आणि आजोबांप्रमाणे गाण्यात काहीही रस नव्हता. त्याने अभिनयात आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

तसे, नीलने बाल कलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. 1988 मध्ये ‘विजय’ आणि 1989 मध्ये ‘जैसी करनी वैसी भरनी’ या चित्रपटात तो बालकलाकार म्हणून झळकला होता.

यानंतर नीलने आपला अभ्यास पूर्ण केला आणि त्यानंतर ‘जॉनी गद्दार’ चित्रपटातून मुख्य नायक म्हणून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी नामांकन देण्यात आले होते. यानंतर त्याला ‘न्यूयॉर्क’ या चित्रपटातून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात नीलसमवेत अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते. नीलने इतर बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले. परंतु, त्याला हवे तितके यश मिळाले नाही. तर दुसरीकडे नीलला हिरोपेक्षा व्हिलनच्या व्यक्तिरेखेत जास्त पसंत केले गेले आहे. मात्र, या सगळ्यातही नील कमाईच्या बाबतीत कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाही.

किती आहे नेट वर्थ?

नीलची संपत्ती तब्बल 6 दशलक्ष डॉलर्स अर्थात 45 कोटींच्या जवळपास आहे. नीलला व्यवसायाद्वारे जास्तीत जास्त नफा मिळतो. त्याचवेळी त्याला एका चित्रपटासाठी तब्बल 2-3 कोटी मिळतात. नीलचे स्वतःचे काही ब्रँड देखील आहेत आणि यासोबत तो जाहिरातींद्वारे देखील कमाई करतो.

नीलचे घर

नील मुकेश आपल्या कुटुंबासह एक आलिशान घरात राहतो. या आलिशान घराची किंमत सुमारे 11.3 कोटींच्या आसपास आहे. तो या आलिशान घरातून आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

कार कलेक्शन

नीलकडे लक्झरी गाड्यांचा संग्रह आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, जॅग्वार आणि ऑडी या कंपनीच्या कार्स आहेत.

नीलने फक्त बॉलिवूडमध्येच नव्हे तर, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. नील शेवटच्या वेळी 2019 मध्ये ‘बायपास रोड’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात नीलसोबत अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात अभिनय करण्याशिवाय नीलनेही त्याची निर्मितीही केली होती.

वैयक्तिक जीवन

नीलने 2017मध्ये रुक्मिणी सहायसोबत लग्नगाठ बांधली. दोघांना एक मुलगी, ‘नूरवी’ असून ती खूप गोड आहे. नील आपल्या लेकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. सध्या नील ब्रेक घेऊन आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे.

(New York fame actor Neil Nitin Mukesh Net worth)

हेही वाचा :

Shehnaaz Gill : डब्बू रत्नानीनं केलं शहनाज गिलचं फोटोशूट, पाहा ग्लॅमरस रुप

संजय दत्तच्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राईज, पाहा KGF 2च्या ‘Adheera’चा खतरनाक लूक!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.