AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Desai : नितीन देसाई यांच्या निधनानंतर 300 तरुणांवर बेरोजगारीचे संकट; सहा गावातील नागरिक चिंतीत

हातनोली येथील सरपंच रितू ठोंबरे यांनी नितीन देसाई यांच्या निधानावर प्रचंड दु:ख व्यक्त केलं आहे. गेल्या दहा वर्षापासून आमचा सर्वांचा नितीन देसाई यांच्याशी संबंध आला आहे.

Nitin Desai : नितीन देसाई यांच्या निधनानंतर 300 तरुणांवर बेरोजगारीचे संकट; सहा गावातील नागरिक चिंतीत
nitin desai Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 04, 2023 | 9:06 AM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कर्जत | 4 जुलै 2023 : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओत जीवन संपवलं. नितीन देसाई यांनी अचानक टोकाचं पाऊल उचलल्याने सिने जगताला मोठा धक्का बसला आहे. आपल्या कला दिग्दर्शनातून बॉलिवूडमध्ये आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवणारा एक हरहुन्नरी कला दिग्दर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. देसाई यांनी अथक संघर्षातून आणि मोठ्या कष्टाने एनडी स्टुडिओ उभारला होता. या स्टुडिओत त्यांनी कर्जत परिसरातील सहा गावातील तरुणांनाच रोजगार दिला होता. आता देसाई यांच्या निधनामुळे या सुमारे 250 ते 300 तरुणांवर बेरोजगारीचं संकट ओढवलं आहे.

नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. देसाई यांच्या एनडी स्टुडिओत काम करणाऱ्या कामगारांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एनडी स्टुडिओमध्ये काम करणारे अनेक तरुण आसपासपासच्या गावातीलच होते. परंतु स्टुडिओला लागून असलेल्या हातानोली गावातील 80 टक्के लोक या स्टुडिओवर अवलंबून आहेत. एनडी स्टुडिओत काम करणारे हातनोली गावातले 100 हून अधिक लोक या ठिकाणी कामाला होते.

आजूबाजूला पाच-सहा वाड्या असून या वाड्यांमधील 200-300 लोक या ठिकाणी काम करतात. हातोनोलीसह कातकरी वाडी, मोरबे गाव, वावरले, आसरा, जांभिवली इत्यादी भागातील तरुण एनडी स्टुडिओमध्ये काम करत आहेत. नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यामुळे आता या स्टुडिओचे पुढे काय होणार? असाच प्रश्न या तरुणांना पडला आहे. कारण अनेक तरुण एनडी स्टुडिओमध्ये आपली उपजीविका करत होते. आता या सर्वांवर बेरोजगारीचं संकट ओढवलं आहे.

स्थानिकांना कामावर घ्या

हातनोली येथील सरपंच रितू ठोंबरे यांनी नितीन देसाई यांच्या निधानावर प्रचंड दु:ख व्यक्त केलं आहे. गेल्या दहा वर्षापासून आमचा सर्वांचा नितीन देसाई यांच्याशी संबंध आला आहे. माझ्या बाबा आणि काकांपासून ते आम्हाला ओळखतात. त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. ते सर्वांना समजून घेत होते. नवनव्या गोष्टी करण्यामध्ये त्यांना प्रचंड आनंद वाटायचा. ते सतत नव्याच्या शोधात असायचे. पण त्यांच्या मनातील दु:ख त्यांनी कधीच बोलून दाखवले नाही. ते कुणाशी याबाबत बोललेही नाही. त्यामुळे नक्की काय झालं हे सांगू शकत नाही. एवढ्या मोठ्या माणसाने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलणं ही गंभीर बाब आहे. याचा तपास झाला पाहिजे, असं रितू ठोंबरे म्हणाल्या.

आमच्या गावातील आणि आसपासच्या गावातील भरपूर लोकं त्यांच्या स्टुडिओत कामाला होते. देसाई यांच्या अचानक निधनामुळे आता या सर्वांवर बेरोजगारीचं संकट निर्माण झालं आहे. हातनोली गावातील लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामाला होते. भविष्यात एनडी स्टुडिओ सुरू केल्यास स्थानिकांना या ठिकाणी कामाला घ्यावं, अशी मागणी ठोंबरे यांनी केली आहे.

घटनेची कल्पनाच नव्हती

दरम्यान, देसाई यांच्या निधनानंतरही एनडी स्टुडिओ पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहे. कालही सकाळीच पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली. पण 15 दिवसांपासून हा स्टुडिओ बंद असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. यातील अनेकांना तर देसाई यांचं निधन झाल्याचं माहीत नव्हतं. आम्हाला घटनेची कल्पना नव्हती. माहीत असतं तर आलो नसतो. या ठिकाणी मुलांना शिकण्यासाठी खूप काही आहे. त्यामुळे हा स्टुडिओ पाहण्यासाठी येत असतो, असं पर्यटक किशोर कालांगडे यांनी सांगितलं. घडलेल्या घटनेवर त्यांनी दु:खही व्यक्त केलं.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी