नसिरुद्दीन शाहंच्या वक्तव्याला पाकिस्तानी मीडियाचा पाठींबा! ट्वीट करत म्हणतायत…

बॉलिवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह (Nasiruddin Shah) यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याची पाकिस्तानातील लोकांमध्ये आणि तिथल्या प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे. त्यांच्या वक्तव्याचा उल्लेख करून लोक भाजप आणि आरएसएसवरही निशाणा साधत आहेत.

नसिरुद्दीन शाहंच्या वक्तव्याला पाकिस्तानी मीडियाचा पाठींबा! ट्वीट करत म्हणतायत...
Nasiruddin Shah
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 30, 2021 | 12:26 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह (Nasiruddin Shah) यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याची पाकिस्तानातील लोकांमध्ये आणि तिथल्या प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे. त्यांच्या वक्तव्याचा उल्लेख करून लोक भाजप आणि आरएसएसवरही निशाणा साधत आहेत. नसिरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत मुस्लिमांविरुद्ध प्रक्षोभक भाषणे देशाला गृहयुद्धाकडे नेणारी असल्याचे म्हटले होते.

प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी हरिद्वार धर्म संसदेवर दिलेल्या वक्तव्याची पाकिस्तानात जोरदार चर्चा होत आहे. नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानच्या मीडियासह अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हणाले नसिरुद्दीन शाह

नसिरुद्दीन शाह यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत हरिद्वार धर्म संसदेत मुस्लिमांविरोधात केलेल्या चिथावणीखोर भाषणाबद्दल सविस्तर बोलले आहेत. ते म्हणाले होते, या लोकांना ते काय बोलतायत हे तरी कळतं की नाही. कारण ते जे काही बोलण्याचं प्रयत्न करतायत ते एक फुल्ल स्केल नागरी युद्ध आहे. मुस्लिमांना भयभीत करण्याचे, घाबरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण आम्ही मुस्लिम 20 कोटी (200 मिलियन) आहोत. हा आकडा खूप साधा का वाटतो? आम्ही 20 कोटी लढू, आम्हा 20 कोटी मुस्लिमांचा ह्याच देशावर दावा आहे, आम्हा 20 कोटींसाठी हीच मातृभूमी आहे. आम्ही इथेच जन्मलोत. आमच्या कित्येक पिढ्या इथेच जन्मल्या आणि गेल्या. आणि मला खात्रीय, की जर कुणी असा मुस्लिमांविरोधात प्रयत्न केलाच तर त्याचा प्रचंड विरोध केला जाईल. ती प्रतिक्रिया संतप्त असेल.’ नसिरुद्दीन शाह यांच्या या वक्तव्याला पाकिस्तानच्या मीडियाने पाठींबा दिला आहे.

पाकिस्तानने उचलून धरला मुद्दा

नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावरून पाकिस्तानचे अधिकृत प्रसारक रेडिओ पाकिस्तानने भारताच्या मोदी सरकारला घेरले आहे. भारत सरकारला फॅसिस्ट सरकार म्हणत रेडिओ पाकिस्तानने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘सुप्रसिद्ध भारतीय अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी फॅसिस्ट मोदी सरकारला मुस्लिमांचा नरसंहार थांबवण्यास सांगितले आहे आणि असा इशारा दिला आहे की अल्पसंख्याक मारले जातील. छळ देशाला गृहयुद्धाकडे नेईल.’

पाकिस्तानच्या अधिकृत टीव्ही चॅनल पीटीव्ही न्यूजनेही भारतीय अभिनेत्याच्या वक्तव्याबाबत अनेक ट्विट केले आहेत. पीटीव्ही न्यूजने त्यांच्या एका लिहिले आहे की, ‘प्रसिद्ध पत्रकार करण थापर यांच्या मुलाखतीत भारतीय अभिनेता नसिरुद्दीन शाह म्हणाले की, भारतात मुस्लिमांना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवले जात आहे आणि हे प्रत्येक क्षेत्रात घडत आहे.’ पाकिस्तानच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी या एपिसोडमध्ये आणखी बरेच ट्विट केले आहेत, ज्यात शाह यांच्या विधानांचा उल्लेख आहे.

नसिरुद्दीन शाह यांच्या विधानाचा संदर्भ देत मोदी सरकारला घेरले

नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत पाकिस्तानातील अनेकांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानचे माजी मुत्सद्दी जफर हिलाली यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत ट्विटमध्ये लिहिले की, ‘अखेर भारतीय व्यक्तीमत्व नसिरुद्दीन शाह यांनी अटळ गृहयुद्धाचा इशारा दिला आहे. या लढतीत पाकिस्तान आणि जग कोणासोबत असेल यात शंका नाही.’

माजी मुत्सद्दी अब्दुल बासित यांनी या विषयावर एक व्हिडीओ बनवला आहे ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, ‘भाजप आणि आरएसएस सत्तेत आल्यापासून अल्पसंख्याकांवर, विशेषत: मुस्लिमांविरुद्ध हिंसाचार वाढला आहे. आम्ही मुस्लिमांची लिंचिंग, अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले पाहिले आहेत. मुस्लिमांवर हल्ले करणार्‍यांवर करणार्‍यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई न केल्याने हे सर्व भाजप करत असल्याचे दिसून येते.’

नया दौर मीडियाचे कार्यकारी संपादक मुर्तझा सोलंगी यांनी नसिरुद्दीन शाह यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ ट्विट केला आणि लिहिले की, ‘नरसंहाराच्या प्रयत्नांमुळे प्रयत्नांमुळे गृहयुद्ध होऊ शकते, मोदींचे मौन दाखवते की त्यांना पर्वा नाही.’

हे सुद्धा वाचा:

Yoga Poses : 2022 वर्षाची निरोगी सुरुवात करण्यासाठी नियमित ‘ही’ 5 योगासने करा!

ओमायक्रॉनने बँकांना धडकी, कर्ज वसुलीला ब्रेक लागण्याची शक्यता, बँक NPA 9 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज 

Ratan Tata : टाटांच्या वाढदिनी केक, टाळ्याही वाजवल्या, पाठही थोपटली, पण हे सगळं करणारा तो तरुण कोण?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें