AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | मुंबईचा पाऊस पाहून राखी सावंतला आठवलं ‘टिप टिप बरसा पानी..’, माध्यमांचे कॅमेरे पाहताच धरला ठेका!

राखीचा हा ‘रेन डान्स’ व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राखी सावंत (Rakhi Sawant) पावसात नाचताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'मोहरा' चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे गाणे गात आहे आणि गाणे गाताना ती पावसात नाचत देखील आहे.

Video | मुंबईचा पाऊस पाहून राखी सावंतला आठवलं ‘टिप टिप बरसा पानी..’, माध्यमांचे कॅमेरे पाहताच धरला ठेका!
राखी सावंत
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 1:49 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अशी ओळख असणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिचा अंदाज संपूर्ण जगात निराळा आहे. आपल्या हटके अंदाजाने ‘बिग बॉस 14’ची टीआरपी उच्चांकावर नेऊन ठेवणारी राखी जिथे हाते तिथे मनोरंजक वातावरण बनते. अलीकडे, राखी सावंत जेव्हा पापाराझींच्या कॅमेरासमोर आली तेव्हा, ती मजेदार मूडमध्ये दिसली होती. राखीने तिथे उभे असलेल्या सर्व छायाचित्रकारांचे देखील मनोरंजन केले (Rakhi Sawant dance in rain on akshay kumar song tip tip barsa paani).

यावेळी राखीने चक्क एका गाण्यावर ठेका धरला होता. राखीचा हा ‘रेन डान्स’ व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राखी सावंत पावसात नाचताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे गात आहे आणि गाणे गाताना ती पावसात नाचत देखील आहे. राखी सावंतचा हा व्हिडीओ केवळ मजेशीरच नाही तर, तिच्यातीला अवखळ बालपणही दाखवते.

पाहा राखीचा भन्नाट व्हिडीओ :

राखी सावंतची ही स्टाईल तिच्या चाहत्यांनाही फार आवडली आहे. मनसोक्त नाचून झाल्यानंतर राखीने फोटोग्राफार्सकडे पहिले आणि म्हणली मला जाऊ द्या आता… राखीचा हा व्हिडीओ सुपर क्यूट असून, चाहत्यांनी तो खूप शेअर देखील केला आहे. हा व्हिडीओ ‘पापाराझी’ विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला काही तासांतच लाखो चाहत्यांनी लाईक आणि शेअर केले आहे.

राखीच्या व्हिडीओवर भरभरून कमेंट

राखीच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपले प्रेम व्यक्त केले, कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी राखी सावंतचे जोरदार कौतुक केले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘मला तिची हटके शैली आवडते कारण, तिला इतर गोष्टींची अजिबात काळजी नाही.’ दुसर्‍या फॅनने लिहिले, ‘बाकीचे कलाकार जसे शो करण्यासाठी स्वत:ला दर्शवतात, कमीतकमी त्याप्रमाणे ती काल्पनिक खोटेपणा तरी दाखवत नाही.’ त्याचप्रमाणे दुसर्‍या एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘ही अगदी वेडी आहे’ (Rakhi Sawant dance in rain on akshay kumar song tip tip barsa paani).

‘बिग बॉस 14’मधून केले चाहत्यांचे मनोरंजन

सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या 14 व्या सीझनमध्ये राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे हा कार्यक्रम बर्‍यापैकी रंजक झाला होता. या शोमध्ये राखीने तिच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आणि शोच्या टॉप-5 फायनलिस्टमध्ये देखील तिने आपले स्थान निश्चित केले होते. त्याचबरोबर शोच्या फिनालेमध्ये राखी सावंतने 14 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडत सर्वांनाच चकित केले होते. ‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राखी सावंतने या घरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. या घरात तिने पती रितेश याच्याबद्दलही अनेक मोठे खुलासे केले होते.

आता ती पुन्हा रितेशशीच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. ती सध्या रितेशच्या संपर्कात असल्याचे तिचे म्हणणे आहे. आता राखी अभिनवला विसरली असल्याचे दिसते आहे. ‘बिग बॉस 14’च्या घरात राखी अभिनव शुक्लासोबत (Abhinav Shukla) लग्न करण्याबद्दलही बोलली होती. इतकेच नाही तर, या घरात रुबिना अर्थात अभिनवची पत्नी असतानाही राखीने अभिनवसमोर अनेक वेळा आपले प्रेम व्यक्त केले होते.

(Rakhi Sawant dance in rain on akshay kumar song tip tip barsa paani)

हेही वाचा :

Video | अल्लू अर्जुनच्या गाण्यावर कार्तिक आर्यनचा धमाल डान्स, व्हिडीओ पाहून बॉलिवूडकरही अवाक्!

PHOTO | बाल्कनी आणि रम्य संध्याकाळ, जान्हवी कपूरच्या घरातून सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.