Saif Ali Khan Net Worth | राजवाडे आणि बंगल्यांचा मालक आहे सैफ अली खान, छोट्या नवाबाचं नेट वर्थ जाणून तुम्ही व्हाल अवाक्!

छोटा नवाब आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) नेहमी त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. सैफने आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज सैफ अली खान त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

Saif Ali Khan Net Worth | राजवाडे आणि बंगल्यांचा मालक आहे सैफ अली खान, छोट्या नवाबाचं नेट वर्थ जाणून तुम्ही व्हाल अवाक्!
Saif Ali Khan

Saif Ali Khan Net Worth : छोटा नवाब आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) नेहमी त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. सैफने आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज सैफ अली खान त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. सैफच्या नावावर करोडोंची संपत्ती आहे. पतौडी घराण्याशी संबंधित असल्यामुळे त्यांची संपत्ती इतर स्टार्सपेक्षा खूप जास्त आहे. चला तर, आज सैफ अली खानच्या नेट वर्थविषयी जाणून घेऊया…

सैफ अली खान नेट वर्थ

सैफ अली खान पतौडी घराण्याशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सैफची एकूण संपत्ती सुमारे 150 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 1120 कोटी आहे. इतकेच नाही तर अभिनेत्याची संपत्ती देखील सतत वाढत आहे. या अहवालानुसार, त्याची कमाई ब्रँड एंडोर्समेंट, चित्रपट आणि वैयक्तिक गुंतवणूकीतून येते.

करोडोंचे पतौडी पॅलेस

सैफला वारसाहक्काने भरपूर मालमत्ता मिळाली आहे, त्यापैकी एक पतौडी पॅलेस आहे. सैफ अली खानच्या हरयाणातील पतौडी पॅलेसच्या जागेची किंमत सुमारे 800 कोटी रुपये आहे. एवढेच नाही, तर अभिनेत्याची मुंबईतही अनेक घरे आहेत. तसेच, त्याचे स्वित्झर्लंडमध्ये व्हेकेशन होम आहे.

282 कोटी मालक

फोर्ब्स 2019च्या यादीनुसार 2018-19 मध्ये सैफ अली खानने 17.03 कोटी रुपयांची कमाई केली. जर, एकूण निव्वळ संपत्तीचा अंदाज लावला, तर सैफ अली खानची स्वतःची कमाई 282 कोटी रुपये आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सैफ अली खान दरमहा 3 कोटी रुपयांहून अधिक कमावतो, तर त्याची वार्षिक कमाई 30 कोटींपेक्षा जास्त आहे. त्याच्या अभिनयाव्यतिरिक्त, निर्माता म्हणून देखील सैफ अली खान चित्रपटाच्या कमाईतून नफ्याचा वाटा घेतो.

लक्झरी कारची आवड

4 मुलांचे वडील असलेल्या सैफला आलिशान कार्सची आवड आहे. त्याच्याकडे अनेक वाहने आहेत. सैफकडे ऑडी, बीएमडब्ल्यू 7, एक्सस 470, मस्तांग, रेंज रोव्हर आणि लँड क्रूझर अशा गाड्या आहेत. सैफ अली खानकडे आजकाल अनेक चित्रपट आहेत, त्यापैकी एक आहे ‘भूत पोलीस’. त्याच वेळी, अभिनेता त्याचा लहान मुलगा ‘जेह’च्या नावामुळे सध्या खूप चर्चेत आहे.

(Saif Ali Khan Net Worth Saif Ali Khan is the owner of palaces and bungalows)

हेही वाचा :

Birthday Special : सैफ अली खान- ‘हम तुम’ ते ‘तान्हाजी’… आगळ्यावेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता!

 मिया इलंय इलंय… प्रतिक्षा संपली, आता नव्याने सुरु होणार तोच रात्रीचा जीवघेणा खेळ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI