AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shriya Saran | वर्षभरापूर्वीच आई बनलीय ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री श्रिया सरन, Video शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज!

अजय देवगणच्या ‘दृष्यम’ या चित्रपटात दिसलेल्या अभिनेत्री श्रिया सरनच्या (Shriya Saran) प्रेग्नेंसीबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. आता स्वत: अभिनेत्रीने या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. तिने सोशल मीडियावर एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे.

Shriya Saran | वर्षभरापूर्वीच आई बनलीय ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री श्रिया सरन, Video शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज!
Shriya saran
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 11:21 AM
Share

मुंबई : अजय देवगणच्या ‘दृष्यम’ या चित्रपटात दिसलेल्या अभिनेत्री श्रिया सरनच्या (Shriya Saran) प्रेग्नेंसीबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. आता स्वत: अभिनेत्रीने या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. तिने सोशल मीडियावर एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे. यासह तिने त्याच्या या गुपितावरून पडदा उठवला आहे. 2020 साली श्रिया आई झाली आणि तिने आता ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तसेच आपल्या लेकीला सर्वांपासून दूर ठेवण्याचा अनुभवही शेअर केला आहे.

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती पती आणि मुलीसोबत दिसत आहे. श्रियाने व्हिडीओसह कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नमस्कार मित्रांनो, वर्ष 2020मध्ये माझे क्वारंटाईन खूप सुंदर आणि वेडेपणाने भरलेले होते. जेव्हा संपूर्ण जग एका वेगळ्या प्रकारच्या उलथापालथातून जात होते, तेव्हा आमचे जग देखील बदलले होते. आपले जीवन साहस, उत्साह आणि नव्या शिकण्याने भरलेले आहे. या काळात आम्हाला भेट म्हणून एक सुंदर देवदूत मिळाली आहे. आम्ही देवाचे आभार मानतो!

पाहा व्हिडीओ :

2018मध्ये झाले होते लग्न

आम्ही तुम्हाला सांगू की 2018 मध्ये श्रियाने राजस्थानमध्ये आंद्रेशी लग्न केले. ते मालदीवमध्ये पहिल्यांदा भेटले होते. लग्नानंतर तिच्या गर्भधारणेविषयी सर्वत्र अफवा पसरल्या होत्या. ती आपल्या पतीसोबत बार्सिलोना, स्पेनमध्ये राहत होती. पण, अभिनेत्रीने 2020 मध्येच भारतात परतण्याचा निर्णय घेतला. आता ती तिच्या पतीसोबत भारतात राहते आहे. श्रिया आई म्हणून खूप उत्साहित आहे आणि तिच्या आयुष्यातील या नवीन अनुभवाचा आनंद घेत आहे.

RRR मध्ये दिसणार श्रिया

श्रिया सरन दक्षिण इंडस्ट्रीची मोठी अभिनेत्री आहे. त्यांनी 2001 पासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिचा पहिला हिंदी चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ हा होता, ज्यात जेनेलिया आणि रितेश देशमुख दिसले होते. 2007 मध्ये, ती इम्रान हाश्मीसोबत ‘आवारापन’ चित्रपटात दिसली होती. दरम्यान, ती बॉलिवूडच्या अनेक आयटम साँगमध्ये दिसली होती. पण तिला अजय देवगणच्या ‘दृष्यम’ चित्रपटातून मोठे यश आणि प्रसिद्धी मिळाली. तिचा शेवटचा हिंदी चित्रपट ‘कुशल मंगल’ होता. सध्या, ती काही नव्या प्रकल्पांचा भाग आहे, त्यापैकी एक ‘RRR’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे.

हेही वाचा :

Apurva Nemlekar : नवरात्रीचा सहावा दिवस; रंग लाल, अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने साकारला एकवीरा देवीचा लूक

Happy Birthday Akshara Haasan | हुबेहूब आपल्या आईसारखीच दिसते कमल हासनची लेक, पाहा अक्षराचे फोटो

Ankita Lokhande | अंकिता लोखंडे म्हणाली- ‘भाड़ में गया प्यार-व्यार’, VIDEO पाहून बॉयफ्रेंड विक्की जैनचे टेन्शन वाढले !

भार्गवी चिरमुलेने नवरात्रीचं निमित्त साधत सांगितलं ‘तात’ साडीचं महत्त्व, तुम्हाला माहितेय का?

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.