गायक आदित्य नारायण झाला बाबा; घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन

गायक आणि 'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायणला (Aditya Narayan) कन्यारत्न प्राप्त झालं आहे. आदित्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली.

गायक आदित्य नारायण झाला बाबा; घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन
Aditya Narayan and Shweta Agarwal
Image Credit source: Instagram/ Aditya Narayan
स्वाती वेमूल

|

Mar 04, 2022 | 12:01 PM

गायक आणि ‘इंडियन आयडॉल’ या रिअॅलिटी शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायणला (Aditya Narayan) कन्यारत्न प्राप्त झालं आहे. आदित्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली. 24 फेब्रुवारी रोजी आदित्यची पत्नी श्वेता अग्रवालने (Shweta Agarwal) मुलीला जन्म दिला. ‘देवाने आमच्या घरी सुंदर चिमुकल्या मुलीला पाठवलं आहे’, असं कॅप्शन देत आदित्यने श्वेतासोबतचा लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. आपल्या घरात मुलीचं आगमन व्हावं, अशी इच्छा आदित्यने याआधी मुलाखतींमध्ये बोलून दाखवली होती. अखेर त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. “श्वेताला मुलगा होणार, असं अनेकजण म्हणत होते. पण मुलगी व्हावी अशी मनोमन इच्छा आहे. वडील आणि मुलीचं नातं हे खूप खास असतं आणि आमच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं, याचा मला खूप आनंद आहे”, असं आदित्य म्हणाला. (Aditya Narayan blessed with baby girl)

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य पुढे म्हणाला, “माझ्या बाबांना सुखद धक्का बसला आहे. ते सतत बाळाकडे पाहत आहेत आणि तिला परी म्हणून हाक मारत आहेत. सुरुवातीला ते तिघा उचलून घ्यायला घाबरत होते, पण काही दिवसांनी मीच बाळाला त्यांच्याकडे दिलं. तिचे डायपर्स बदलणं आणि इतर कामांना मी सुरुवात केली आहे. ती माझ्यासारखी दिसते असं मला वाटतं. देवाने तिच्या रुपात सुंदर भेट आम्हाला दिली आहे.”

आदित्य आणि श्वेताने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधली. दोघेही बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आदित्यने होस्टिंगपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. “पुढच्या वर्षी मी टीव्हीपासून ब्रेक घेणार आहे. मी खूप आभारी आहे की, मला एकाच वेळी बर्‍याच गोष्टी करण्याची संधी मिळाली, पण ती दमछाक करणारी आहे. गेल्या 15 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग असल्याबद्दल मी सगळ्यांचा खूप आभारी आहे,” असं त्याने म्हटलं होतं.

हेही वाचा: 

Video: ‘कच्चा बदाम नाही, शिवरायांच्या महाराष्ट्राची लेक’; ‘पावनखिंड’च्या गाण्यावर चिमुकलीचा डान्स

नागराजमुळे त्या पठ्ठ्याचं आयुष्यच बदललं; 20 वर्षीय मुलाचं स्वप्न साकार

‘अमिताभ बोलतो का रे सेटवर, समोरच्याला घाबरवत असेल ना तो’; किशोर कदम म्हणतात..

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें