Sushant’s Throwback Video: अंकिताशिवाय राहूच शकत नव्हता सुशांत, एका मुलाखतीतून उलगडली होती लग्नाची स्वप्ने

सुशांतनं अगदी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की त्याच्याबरोबर राहणं कठीण आहे. अंकिता गेले साडेसहा वर्षे त्याच्यासोबत आहे आणि ती खूप संयमी आणि खूप प्रेमळ आहे. एवढंच नाही तर सुशांतनं सांगितलं की तो तिच्याशिवाय सहजपणे जगू शकत नाही. (Sushant's Throwback Video: Sushant said that he couldn't live without Ankita, marriage dreams unfolded in an interview)

Sushant's Throwback Video: अंकिताशिवाय राहूच शकत नव्हता सुशांत, एका मुलाखतीतून उलगडली होती लग्नाची स्वप्ने
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 26, 2021 | 7:46 AM

मुंबई : नेहमीच चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या सुशांतसिंह राजपूतच्या (Sushan Singh Rajput) निधनाला आता एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. अशा परिस्थितीत सुशांतचे चाहते अनेकदा सोशल मीडियावर जुने व्हिडिओ आणि फोटो शेअर करुन त्याची आठवण काढत असतात. अशा परिस्थितीत आता सुशांतचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो प्रत्येक गोष्टीवर उघडपणे बोलताना दिसतो आहे.

एका मुलाखती दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या मुलाखतीत, सुशांत आपल्या अभिनय आणि लग्नाबद्दल उघडपणे बोलला. सुशांतच्या या मुलाखतीचा व्हिडिओ चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरला आहे.

छोट्या पडद्यावर विचार करून प्रवेश केला

सुशांतनं असं म्हटलं होतं की जेव्हा त्यानं डान्स करायला सुरुवात केली तेव्हा तो प्रेक्षकांशी जोडला गेला होता, तेव्हा तो अभिनेता होईल असा विचार त्यानं केला नव्हता. एवढंच नाही तर त्यानं सांगितलं होतं की तो मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आहे, तो चार बहिणींपेक्षा लहान आहे. सुशांतनं या मुलाखतीत सांगितलं होतं की त्यानं बॉलिवूड ऐवजी प्रथम टीव्हीमध्ये करिअरची सुरुवात केली होती. जेव्हा बालाजीच्या टीव्ही शोची ऑफर मिळाली तेव्हा त्यानं लगेच हो सांगितलं.

सुशांतने लग्नाबद्दल एक खास गोष्ट सांगितली होती

सुशांतनं अगदी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की त्याच्याबरोबर जगणं कठीण आहे. अंकिता गेले साडेसहा वर्षे त्याच्यासोबत आहे आणि ती खूप संयमी आणि खूप प्रेमळ आहे. एवढंच नाही तर सुशांतनं सांगितलं की मी तिच्याशिवाय सहजपणे जगू शकत नाही. पुढे तो म्हणाला होता की मी भावनात्मकदृष्ट्या असुरक्षित अशी व्यक्ती आहे आणि मला आता तिच्याबरोबरच राहायचं आहे.

सुशांत मुलाखतीत पुढे म्हणाला होता की जेव्हा जेव्हा त्याला अंकितासोबत लग्न कधी करणार असं विचारलं जातं तेव्हा तो नेहमीच उघडपणे बोलतो. त्यानं हा खुलासा केला होता की, “मी पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे. हे मी अगदी आत्मविश्वासानं सांगतो आहे, पण मी अंकिताला अद्याप विचारलेलं नाही म्हणून मी खूप घाबरलो आहे. इतकंच नाही तर सुशांतनंही सांगितलं होतं की अंकिताला भव्य लग्न करण्याची इच्छा आहे आणि लवकरच ती तयारी सुरू करेल.

संबंधित बातम्या

Bachpan Ka Pyaar : ‘बचपन का प्यार’ फेम सहदेवचं नशीब उघडलं, लवकरच झळकणार बादशाहच्या गाण्यात?

Raj Kundra Case : उमेश कामतच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समधून खुलासा, गेहना वसिष्ठचं फक्त ‘हॉटशॉट’च नाही तर ‘हॉटहिट’ मध्येही काम

Monalisa : ब्लॅक साडीत मोनालिसाचा ग्लॅमरस अवतार, फोटो पाहाच

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें