Swara Bhasker | स्वरा भास्करने ट्रोलर्ससोबत घेतला पंगा, म्हणाली की करण हा…

स्वरा भास्कर म्हणाली की, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे मला दु:ख वाटते. सुशांत सिंहच्या मृत्यूला काही लोक करण जोहरला कारणीभूत ठरवतात.

Swara Bhasker | स्वरा भास्करने ट्रोलर्ससोबत घेतला पंगा, म्हणाली की करण हा...
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 9:10 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) आणि वाद हे समीकरण फार पूर्वीपासून चालत आलेले आहे. स्वरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. विषय कोणताही असो स्वरा आपले मत मांडायला आणि पंगा घ्यायला अजिबात घाबरत नाही. परिणामी अनेकदा स्वराला टीकेचा (Criticism) सामनाही करावा लागतो. बऱ्याचवेळा तर आपल्या बेधडक शैलीसाठीमुळे स्वराला त्रासही होतो. आता करण जोहरवर (Karan Johar) स्वराने अत्यंत मोठे विधान केले आहे. यामुळे पुन्हा एकदा स्वराचे नाव चर्चेत आलंय.

स्वरा भास्करने करण जोहरवर केले अत्यंत मोठे विधान

स्वराने नुकताच ‘बॉयकॉट ट्रेंड’वर आपले मत मांडले आहे. इतकेच नाही तर स्वरा यावर बिनधास्त बोलली आहे. दरवेळी सर्वांसोबत पंगे घेणारी स्वरा यावेळी चक्क करण जोहरची पाठराखण करताना दिसलीये. करण जोहर विरोधात सुरू असलेल्या मोहिमेबद्दल आणि सोशल मीडियावरी ट्रोलिंगबद्दल तिने आपले मत मांडले आहे. निश्चितपणेच स्वराचे हे मत अनेकांच्या पचनी पडणार नाहीये. चला तर स्वरा नेमकी काय म्हणाली आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

बॉयकॉट ट्रेंडवर बोलताना करणची पाठराखण करत स्वरा म्हणाली की…

स्वराने कनेक्ट एफएम कनाडाला एक मुलाखत दिलीये. यावेळी बोलताना स्वरा भास्कर म्हणाली की, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे मला दु:ख वाटते. सुशांत सिंहच्या मृत्यूला काही लोक करण जोहरला कारणीभूत ठरवतात. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर ज्याप्रकारे करण जोहरबद्दल ट्रोलिंग सुरू आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही करण जोहरवर राग व्यक्त करतात, त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकतात, तुम्हाला करण आवडत नाही. मात्र, हे एक सत्य आहे की, करण हा सुशांत सिंह राजपूतचा खुनी नाहीये.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.