Vikram Vedha | हृतिक रोशनच्या ‘विक्रम वेधा’चे नवे शेड्युल सुरु, सैफ अली खानसोबत मिळून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) अबुधाबीमध्ये त्याच्या आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’चे (Vikram Vedha) पहिले शूटिंग शेड्यूल पूर्ण केले आहे. चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श (Taran Aadarsh) यांनी ही माहिती दिली आहे.

Vikram Vedha | हृतिक रोशनच्या ‘विक्रम वेधा’चे नवे शेड्युल सुरु, सैफ अली खानसोबत मिळून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार!
Hrithik Roshan-Vikram Vedha

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) अबुधाबीमध्ये त्याच्या आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’चे (Vikram Vedha) पहिले शूटिंग शेड्यूल पूर्ण केले आहे. चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श (Taran Aadarsh) यांनी ही माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, हृतिकने या चित्रपटाचे अॅक्शन सीक्वेन्स अबुधाबीमध्ये शूट केले आहेत. दुसरीकडे, चित्रपटाच्या निर्मात्यांनी लखनऊमध्ये अभिनेता सैफ अली खानसोबत (Saif Ali Khan) चित्रपटाच्या दुसऱ्या शूट शेड्यूलवर काम सुरू केले आहे.

ट्विटरवर एक फोटो शेअर करताना तरण आदर्शने लिहिले की, ‘विक्रम वेधा’: हृतिकने अबूधाबीमधील शूटिंग पूर्ण केले. आता  सैफ लखनऊमध्ये शुटिंग सुरू करणार… 30 सप्टेंबर 2022 चित्रपट रिलीज होणार!

सुपरहिट साऊथ चित्रपटाचा रिमेक!

‘विक्रम वेधा’ हा चित्रपट 2017 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या सुपरहिट चित्रपटात आर माधवनने एका उमदा पोलीस अधिकाऱ्याची अर्थात ‘विक्रम’ची भूमिका, तर विजय सेतुपतीने गँगस्टर वेधाची भूमिका साकारली होती. या मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केले होते. आता हिंदी रिमेकचे दिग्दर्शन देखील तेच करणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात हृतिक एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट विक्रम-वेतालच्या प्राचीन कथेतून रेखाटला आहे, जिथे एक चतुर गुंड प्रत्येक वेळी त्याच्या आयुष्यातील नवीन कथा सांगून पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा मार्ग शोधतो.

आमिरच्या नावाचीही चर्चा!

यापूर्वी आमिर खान या चित्रपटात वेधाची भूमिका साकारेल अशी बातमी होती. पण, नंतर असे म्हटले गेले की, आमिरने चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. आमिरने नकार दिल्यानंतर हृतिकला वेधासाठी फायनल करण्यात आले.

दोघांचे आगामी प्रकल्प

हृतिक लवकरच ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शुक्रवारीच हृतिकने दीपिका आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकासमवेत एक फोटो शेअर केला होता आणि लिहिले की, ‘ही गँग टेक ऑफ करण्यास तयार आहे.’ ‘फायटर’ हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे.

तर, दुसरीकडे सैफ अली खान नुकताच ‘भूत पोलिस’ चित्रपटामध्ये झळकला आहे. या चित्रपटात सैफ व्यतिरिक्त अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिज मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लवकरच सैफ ‘आदिपुरुषा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सैफ, प्रभास आणि कृती सॅनॉन मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा :

Janhvi Kapoor | परी म्हणू की सुंदरा… जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही घायाळ!

Priya Bapat | ‘मैं भी गुलाबी तू है गुलाबी, दिन भी गुलाबी है गुलाबी ये कहर…’, प्रिया बापटच्या स्मायलिंग अंदाजावर खिळल्या नजरा!

RRR Movie | प्रदर्शनापूर्वीच RRR चित्रपटाचा नवा विक्रम! अमेरिकेतील बहुसंख्य मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट!


Published On - 1:33 pm, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI