दोन वर्षांपूर्वीची पार्टी करण जोहरला महागात पडणार? ‘तो’ व्हायरल व्हिडीओ NCBच्या रडारवर!

गेल्या वर्षी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूड स्टार्सची चौकशी सुरू झाली, तेव्हा सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल झाला. हा व्हिडीओ बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरच्या घरातील होता, जिथे अनेक बॉलिवूड स्टार्स पार्टी करताना दिसत होते.

दोन वर्षांपूर्वीची पार्टी करण जोहरला महागात पडणार? ‘तो’ व्हायरल व्हिडीओ NCBच्या रडारवर!
Karan Johar
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 12:36 PM

मुंबई : गेल्या वर्षी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूड स्टार्सची चौकशी सुरू झाली, तेव्हा सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल झाला. हा व्हिडीओ बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरच्या घरातील होता, जिथे अनेक बॉलिवूड स्टार्स पार्टी करताना दिसत होते. करण जोहरच्या या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर करण्यात आल्याचा दावा या व्हिडीओबाबत करण्यात आला होता.

या व्हिडीओची तपासणी करण्यात आली होती, परंतु त्या वेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने त्याबाबत कोणतेही विधान दिले नव्हते. जरी, करण जोहरने आपले निवेदन जारी करताना त्याच्यावरील आरोप फेटाळले होते. परंतु, त्याला एनसीबीकडून क्लीन चिट देखील मिळाली नाही. दरम्यान, अशी बातमी आहे की करण जोहरच्या 2019 पार्टीचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा NCB च्या रडारवर आहे.

करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ NCB च्या रडारवर!

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाचा तपास एनसीबीने बंद केलेला नाही. एवढेच नाही तर एनसीबीला या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्र सरकारकडून 6 महिन्यांचा अधिक वेळ मिळाला आहे. समीर वानखेडे यांनी या व्हिडीओची चौकशी सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती, जी त्यांना मिळाली आहे. आता यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्स समीर वानखेडे यांच्या निशाण्यावर येणार आहेत.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

व्हायरल झालेल्या करण जोहरच्या पार्टीच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिले असेल की, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, करण जोहर, विकी कौशल, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर असे अनेक स्टार्स पूर्ण धुंद होऊन एन्जॉय करताना दिसले. या दरम्यान, व्हिडीओमध्ये काहीतरी पांढरे आणि पावडरसारखे देखील दिसत होते, जे ड्रग्स असल्याचा दावा देखील करण्यात आला होता. तथापि, करण जोहर हे दावे पूर्णपणे नाकारत आहेत. करण जोहरने आपल्या एका वक्तव्यात म्हटले होते की, सेलिब्रिटींपैकी कोणीही आपल्या पार्टीमध्ये ड्रग्ज घेतले नव्हते. तो म्हणाला की, त्याच्या या व्हिडिओचीही चौकशी करण्यात आली होती, त्यानंतर अधिकाऱ्यांना तपासात काहीही सापडले नाही.

गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही NCB बॉलीवूडच्या ड्रग्स नेक्ससमुळे चर्चेत आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCB च्या अटकेत आहे. आर्यन खानचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने काल फेटाळला होता, त्यानंतर त्याने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज म्हणजेच गुरुवारी (21 ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे.

हेही वाचा :

Song Aila Re Aillaa : अजय-रणवीरसोबत अक्षयचे जोरदार ठुमके, बहुप्रतीक्षित ‘सूर्यवंशी’चं पाहिलं गाणं चाहत्यांच्या भेटीला!

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामिनासाठी हायकोर्टात धाव, आता NCB ची पुढची पावलं काय?

The Big Picture : ‘द बिग पिक्चर’च्या सेटवर सारा-जान्हवीची हजेरी; रणवीर सोबत केली धमाल, पाहा फोटो

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.