Zoom Zoom Song Out : सलमान खान आणि दिशा पटानीची जबरदस्त डान्स, ‘झूम झूम’ गाण्यावर प्रेक्षकांनीही धरला ठेका

ईदच्या आधीपासूनच सलमाननं चाहत्यांना गिफ्ट देण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटातील एक एक गाणं रिलीज करण्यात येत आहे. (Zoom Zoom Song Out: Salman Khan and Disha Patani's great dance)

Zoom Zoom Song Out : सलमान खान आणि दिशा पटानीची जबरदस्त डान्स, ‘झूम झूम’ गाण्यावर प्रेक्षकांनीही धरला ठेका

मुंबई : बॉलिवूडचे भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) राधे (Radhe) या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. ईदच्या निमित्तानं हा चित्रपट 13 मे रोजी रिलीज करण्यात येणार आहे. ईदच्या आधीपासूनच सलमाननं चाहत्यांना गिफ्ट देण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटातील एक एक गाणं रिलीज करण्यात येत आहे. ही गाणी सध्या ट्रेंडिंग लिस्टमध्येसुद्धा आहेत. आज या चित्रपटातील चौथं गाणं ‘झूम झूम’ देखील रिलीज झालं आहे. या गाण्यात सलमानबरोबर दिशा पटानी दिसली आहे.

सलमान खानची सोशल मीडिया पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

गाणं शेअर करताना सलमान खाननं लिहिलं की – जर ‘झूम’ करायची वेळ नसेल तर घरीच राहा आणि ‘झूम झूम’ पाहा. कृपया सुरक्षित राहा. या गाण्यात दिशा आणि सलमानचा जबरदस्त डान्स पाहायला मिळणार आहे.

साजिद खान यांचं संगीत, कुणाल वर्मा यांचं लिरिक्स तर युलिया वंतूरचा आवाज

झूम झूम या गाण्याला साजिद खान यांनी संगीत दिलं असून हे गाण कुणाल वर्मा यांनी लिहिलं आहे. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे हे गाणं सलमान खानची खास मैत्रिण युलिया वंतूरनं गायलं आहे. राधे चित्रपटातील सिटी मार हे गाणेही युलिया वंतूरनं गायलं आहे.

‘राधे’ हा सलमान खानचा सर्वात छोटा चित्रपट

रिपोर्ट्सनुसार राधे हा सलमान खानच्या कारकिर्दीचा सर्वात लहान चित्रपट असणार आहे. चित्रपटाची वेळ 1 तास 54 मिनिटे सांगितली जात आहे. मात्र अद्याप निर्मात्यांनी याची यावर काही सांगितलेलं नाहीये.

चित्रपटाच्या कमाईतून करणार ‘ही’ कामं

सलमान खान आणि ‘राधे’च्या निर्मात्यांनी जाहीर केलं आहे की या चित्रपटामधून त्यांना जे काही पैसे मिळतील त्या पैशांमधून कोरोनासाठी मदत केली जाईल. हे पैसे ऑक्सिजन सिलिंडर, कन्सेंट्रेटर आणि व्हेंटिलेटरसाठी देण्यात येतील.

चित्रपटातील 21 सिन कट

सेन्सॉर बोर्डाविना या चित्रपटातील 21 सिन कट केले आहेत. निर्मात्यांनुसार हा कौटुंबिक चित्रपट आहे, त्यामुळे ही दृश्यं काढली गेली आहेत.

संबंधित बातम्या

Anniversary Special : नेहा धुपिया आणि अंगद बेदीची थर्ड वेडिंग अ‍ॅनिवर्सरी, वाचा ‘या’ खास गोष्टी

Photo: बॉलिवूडमध्ये लवकरच नव्या अभिनेत्रीचं डेब्यू; ही हॉट गर्ल कुणाची मुलगी माहितीय?