Anniversary Special : नेहा धुपिया आणि अंगद बेदीची थर्ड वेडिंग अ‍ॅनिवर्सरी, वाचा ‘या’ खास गोष्टी

नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या लग्नाला आज तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. (Neha Dhupia and Angad Bedi's Third Wedding Anniversary, Relationship, weeding and cute baby girl read this Special story)

1/12
Neha Dupia
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या लग्नाला आज तीन वर्ष पूर्ण झालेत. 3 वर्षांपूर्वी 10 मे 2018 ला या दोघांनी लग्न करून सर्वांना चकित केलं होतं. या जोडप्याचा लग्नाचा पहिला फोटो येताच चाहत्यांना धक्का बसला होता. या निमित्तानं, या दोघांबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
2/12
Neha Dupia
नेहा आणि अंगद त्यांच्या एका मित्रांद्वारे भेटले होते. मात्र या भेटीपूर्वी अंगदचं नेहावर एकतर्फी प्रेम होतं.
3/12
Neha Dupia
एका मुलाखतीत अंगदनं नेहाचे किस्से शेअर केले होते. त्याने सांगितलं- 'जेव्हा मी दिल्लीमध्ये 19 वर्षांखालील क्रिकेट खेळत होतो, जेव्हा मी जिम सत्रात शॉर्ट्स परिधान केलेली मुलगी पाहिली. तिच्या रनिंग टेक्निकनं मी खूप प्रभावित झालो होतो. नंतर मला समजलं की तिचं नाव नेहा धुपिया आहे आणि ती मिस इंडिया स्पर्धेसाठी तयारी करत आहे.
4/12
Neha Dupia
काही वर्षांनंतर दोघांची पुन्हा मुंबईत भेट झाली आणि तिथं मैत्री आणि प्रेम झालं. नेहाने अंगदला सांगितलं की तिला फक्त मैत्री करायची आहे आणि अशा प्रकारे या दोघांच्या नात्याला सुरुवात झाली. या रिलेशनशिप दरम्यान दोघंही एकमेकांसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते.
5/12
Neha Dupia
काही काळानंतर दुसर्‍या मुलाखतीत अंगद नेहाबरोबरच्या त्याच्या नात्यावर बोलला. तो म्हणाला होता- 'आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये आहोत आणि आमच्यासाठी ही कधीच समस्या ठरली नाही. मात्र जेव्हा आपल्याला आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्याबरोबर घालवायचं असतं तेव्हा आपण एखादा मित्र निवडतो. मग तो मित्र अशिक्षित आहे की दहा कोटी कमवतो यानं काही फरक पडत नाही.
6/12
Neha Dupia
कालांतराने नेहाचे अंगदवरील प्रेम वाढत गेलं. ती म्हणाली होती- 'आमच्या मित्रांना माहित होतं की अंगद मला आवडतो, मात्र मी या नात्यात येईपर्यंत ते प्रेम एकतर्फी होतं. चार वर्षांपूर्वी त्यानं माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला होता मात्र मी नकार दिला कारण त्यावेळी मी तयार नव्हते. तो परत आला आणि त्यानं मला सांगितलं की मी त्याच्या आयुष्याची चार वर्षे वाया घालविली.
7/12
Neha Dupia
अंगदनं नेहाला नेहमीच आपल्या पत्नीच्या रुपात पाहिलं आहे. याचा खुलासा स्वतः नेहानं केला होता. तिने सांगितलं- 'तो म्हणायचा की मला फक्त तुझ्याशी संबंध ठेवायचे नाही. एकतर तू माझी पत्नी आहेस किंवा काहीच नाही.
8/12
Neha Dupia
अंगद आणि नेहाने अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला. ते दिल्लीला गेले आणि रात्री त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अंगदनं याबाबत सांगितलं आहे. तो म्हणाला - 'आम्हाला ते लपवायचं नव्हतं. आम्हाला हे लग्न फक्त खाजगी ठेवण्याची इच्छा होती. जेव्हा आम्ही दिल्लीला गेलो होतो तेव्हा आम्ही लग्न करणार असं वाटलं नव्हतं. मी माझा ट्रॅक पॅन्ट आणि टीशर्ट परिधान करुन गेलो होतो. एक रात्र दिल्लीत घालवून आम्ही परत येण्याचा प्लॅन होता.
9/12
Neha Dupia
दिल्लीत आल्यानंतर अंगद यांनी नेहाच्या घरी त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं आणि त्यानंतर दोघांनी खासगी सोहळ्यात कुटुंबातील सदस्यांच्या संमतीनं लग्न केलं.
10/12
Neha Dupia
लग्नाच्या काही महिन्यांनंतर, ऑगस्ट 2018 मध्ये नेहानं आपल्या गरोदरपणाच्या घोषणेसह चाहत्यांना पुन्हा एकदा आश्चर्यचकित केलं. तिच्या गरोदरपणानंतर, लोकांनीही बरेच प्रश्न उपस्थित केले, मात्र या जोडप्यानं देखील यास चोख प्रत्युत्तर दिलं.
11/12
Neha Dupia
18 नोव्हेंबर 2018 ला नेहानं एक सुंदर मुलगी मेहरला जन्म दिला. मेहेरच्या जन्मानंतर तिची एक झलक पाहण्याची चाहते उत्सुक होते.
12/12
Neha Dupia
मोठ्या कालावधीनंतर नेहा आणि अंगदनं मुलीचा चेहरा सोशल मीडियावर शेअर केला.