फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? कपूर घराण्याशी आहे खास नातं

फोटोत गोड हसणाऱ्या या चिमुकलीला ओळखलंत का? या मुलीचं आता कपूर घराण्याशी खूप खास नातं आहे. बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र लग्नानंतर ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर केली. ही मुलगी कोण आहे, ओळखा पाहू..

फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? कपूर घराण्याशी आहे खास नातं
या चिमुकलीला ओळखलंत का?Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 10:14 AM

मुंबई : 18 नोव्हेंबर 2023 | फोटोमधील या चिमुकल्या मुलीला तुम्ही ओळखलंत का? फोटोत दिसणारी ही चिमुकली आता कपूर घराण्याची सून आहे. हा फोटो ज्या चित्रपटातील आहे, त्यात तिने दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. खऱ्या आयुष्यात आता ही मुलगी दोन मुलांची आई आणि त्यासोबतच आजीसुद्धा आहे. ही अभिनेत्री कोण आहे, असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर नीतू सिंह कपूर आहे. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची पत्नी नीतूने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांचा हा फोटो ‘दो कलियाँ’ या चित्रपटातील आहे, ज्यामध्ये नीतू यांनी जुळ्या मुलींची भूमिका साकारली होती. या चित्रपटात नीतू यांच्या आईची भूमिका अभिनेत्री माला सिन्हा यांनी साकारली होती. यामध्ये मेहमूद, ओम प्रकाश, बिस्वजीत चॅटर्जी आणि निगार सुल्ताना यांच्याही भूमिका आहेत.

लहान मुलांच्या दृष्टीकोनातून हा चित्रपट बनवला गेला होता. त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. लहान मुलांवर आधारित या चित्रपटात ड्रामा, कॉमेडी, भावना या सर्वांचा तडका होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नीतू सिंह या केवळ आठ वर्षांच्या होत्या. इतक्या कमी वयातही त्यांनी जबरदस्त अभिनय केला होता. नीतू सिंह आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत.

हे सुद्धा वाचा

नीतू सिंह यांना लहानपणापासूनच नृत्याची खूप आवड होती. म्हणूनच त्यांच्या आईने अभिनेत्री वैजयंती माला यांच्या नृत्य शाळेत नीतू यांना दाखल केलं होतं. नीतू यांच्या नृत्याने प्रभावित झालेल्या वैजयंती माला यांनी नंतर त्यांना बालकलाकार म्हणून ‘सूरज’ हा पहिला चित्रपट दिला. बालकलाकार म्हणून यश मिळवल्यानंतर नीतू सिंह यांनी 1973 मध्ये ‘रिक्षावाला’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. यानंतर त्यांनी नासिर हुसैन यांच्या ‘यादों की बारात’ या चित्रपटात काम केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला.

नीतू सिंह यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत दहाहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. एकत्र काम करत असतानाच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 1979 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. कपूर कुटुंबाच्या परंपरेप्रमाणेच लग्नानंतर नीतू यांनी हिंदी सिनेसृष्टीपासून फारकत घेतली. बऱ्याच काळानंतर 2010 मध्ये त्यांनी इंडस्ट्रीत पुनरागमन केलं. सध्या त्या रिॲलिटी शोज आणि चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत.

शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....