…म्हणून मुख्यमंत्र्यांनी थिएटरमध्ये जाऊनही ‘तान्हाजी’ पाहिला नाही!

ख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज आज बहुचर्चित ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपट पाहण्यासाठी दादरच्या प्लाझा थेएटरमध्ये पोहोचले. मात्र, त्यांनी हा चित्रपट पाहिला नाही.

...म्हणून मुख्यमंत्र्यांनी थिएटरमध्ये जाऊनही 'तान्हाजी' पाहिला नाही!
Follow us
| Updated on: Jan 21, 2020 | 10:24 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज आज बहुचर्चित ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपट पाहण्यासाठी दादरच्या प्लाझा थेएटरमध्ये पोहोचले (CM Did Not Watch Tanhaji Movie). मात्र, त्यांनी हा चित्रपट पाहिला नाही. तर आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत हा चित्रपट बघणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वाईल्ड मुंबई चित्रफीतीच्या शुभारंभ कार्यक्रमात सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्लाझामध्ये अजय देवगण सोबत आणि पालिका कर्मचाऱ्यांसोबत तान्हाजी चित्रपट पाहणार होते. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी ते संपूर्ण मंत्रिमंडळासोबत चित्रपट पाहणार असल्याचं सांगितलं (CM Did Not Watch Tanhaji Movie).

‘मी आज नाही, तर माझ्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत नंतर तान्हाजी बघेन’, असं मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महापालिका निर्मित वाईल्ड मुंबई चित्रफीतीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वीरमाता जिजाबाई उद्यानातील निसर्ग माहिती केंद्राचे सादरीकरणही करण्यात आले. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीण परदेशी उपस्थित होते.

‘मुंबईला निसर्गाचे सुंदर देणे लाभले आहे. पण, आपण सगळे ते देणे विसरलो आणि चटईक्षेत्राच्या मागे लागलो. त्यामुळे आता आपापली चटई पसरा’, असे सांगत निसर्ग जपण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

छगन भुजबळ यांच्याकडूनही ‘तान्हाजी’चं कौतुक

राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही काल नाशिकमध्ये ‘तान्हाजी’ सिनेमा पाहिला. भुजबळांनी ‘तान्हाजी’च्या पोस्टरपुढे उभं राहून सेल्फीही काढला होता.

‘तान्हाजी’ प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

‘तान्हाजी’ सिनेमात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, अजिंक्य देव, देवदत्त नागे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. कोंढाणा मोहीम फत्ते करताना वीरमरण आलेल्या तानाजी मालुसरेंचा गौरवशाली इतिहास ‘तान्हाजी’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर साकारण्यात आला आहे.

प्रेक्षकांनी ‘तान्हाजी’ चित्रपट डोक्यावर घेतला असून दहा दिवसात दीडशे कोटींचा गल्ला जमवण्यात चित्रपटाला यश आलं आहे. महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करावा अशी मागणी वारंवार केली जात आहे. आता बारा दिवसांनी चित्रपट करमुक्त होणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

दरम्यान, ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ऐतिहासिक कथेशी सहमत नसल्याचं मत चित्रपटात उदयभानची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केलं आहे. चित्रपट चालण्यासाठी राजकीय कथा बदलून दाखवण्यात आली आहे. हे अत्यंत धोकादायक आहे, असं सैफ एका मुलाखतीत म्हणाला होता.

CM Did Not Watch Tanhaji Movie

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.