Shahrukh khan birthday : शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाहत्यांची शाहरुखच्या बंगल्याबाहरे गर्दी

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा आज (2 नोव्हेंबर) 54 वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस शाहरुखच्या चाहत्यांसाठी खास (Sharukh khan birthday) असतो.

Shahrukh khan birthday : शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाहत्यांची शाहरुखच्या बंगल्याबाहरे गर्दी

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा आज (2 नोव्हेंबर) 54 वा वाढदिवस आहे. हा दिवस शाहरुखच्या चाहत्यांसाठी खास (Sharukh khan birthday) असतो. दरवर्षी शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त (Sharukh khan birthday) मोठ्या प्रमाणात चाहते त्याच्या मुंबईतील निवासस्थान मन्नत येथे त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमा होतात. काल (1 नोव्हेंबर) रात्री उशिराही शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. यावेळी शाहरुखनेही घराच्या बाल्कनीत येऊन आपल्या चाहत्यांचा उत्साह वाढवला.

काही महत्त्वाच्या दिवशी शाहरुखचे चाहते त्याच्या घराबाहेर त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमा होतात. ईद, दिवाळी किंवा होळीसारख्या सणांच्या दिवशीही शाहरुख बाल्कनीमध्ये येऊन आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देतो. तसेच्या त्याच्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळते. रात्रीपासून त्याचे चाहते त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि एक झलक मिळवण्यासाठी त्याच्या घराकडे जमा होतात.

बऱ्याच चाहत्यांनी शाहरुखकेड टी-शर्टही फेकले. हे टी-शर्ट शाहरुखसाठी त्याचे बर्थडे गिफ्ट होते. चाहत्यांचे प्रेम पाहून शाहरुखही खूश झाला. यावेळी शाहरुखने चाहत्यांनी गोंधळ कमी करा, बाजूला लोक झोपलेत, असं त्याने इशारा करत सांगितले.

शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनीही मोठ्याने ‘हॅपी बर्थडे टू यू’ असं गाणं गात त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी शाहरुखनेही दोन हात जोडून सर्व चाहत्यांचे आभार व्यक्त केले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *