AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दलजीत कौरचं सूचक वक्तव्य; म्हणाली “महिला खूप घाबरतात..”

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजीतने गेल्या वर्षी मार्च महिन्यात केन्यातील निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं होतं. आता पतीसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान तिने महिलांविषयी वक्तव्य केलं आहे.

दुसऱ्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दलजीत कौरचं सूचक वक्तव्य; म्हणाली महिला खूप घाबरतात..
Dalljiet Kaur Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 06, 2024 | 8:15 AM
Share

मुंबई : 6 मार्च 2024 | ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकेत भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दलजीत कौर अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. गेल्या काही दिवसांपासून दलजीतच्या घटस्फोटाची चर्चा आहे. दलजीतने गेल्या वर्षी बिझनेसमॅन निखिल पटेलशी धूमधडाक्यात लग्न केलं होतं. दलजीत आणि निखिल या दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. लग्नानंतर ती निखिलसोबत केन्यामध्ये स्थायिक झाली होता. आता वर्ष पूर्ण होण्याआधीच ती मुलाला घेऊन भारतात परतली. सोशल मीडियावरही तिने पतीसोबतचे सर्व फोटो डिलिट केले. त्यामुळे दलजीतचं दुसरं लग्नही अयशस्वी ठरल्याचं म्हटलं गेलं. आता नुकत्याच एका कार्यक्रमात तिने महिलांविषयी वक्तव्य केलंय, ज्यामुळे तिची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. दलजीतने थेट तिच्या घटस्फोटावर भाष्य केलं नाही, मात्र अप्रत्यक्षरित्या तिने महिलांवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

कार्यक्रमानंतर पत्रकारांनी दलजीतला महिला सशक्तीकरणाविषयी प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, “आपण कितीही पुढे गेलो, प्रगती केली असं म्हटलं तरी खऱ्या अर्थाने महिला आजसुद्धा पुढे जायला खूप घाबरतात. मग तो समाज असो किंवा टीकाकार असो.. महिला आजही अनेक गोष्टींना घाबरतात. पण एक अभिनेत्री, एक आई आणि एक महिला असल्याच्या नात्याने मी माझी बाजू खंबीरपणे मांडते. यात काहीच दुमत नाही की महिला खूप पॉवरफुल असतात.” घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दलजीतचं हे वक्तव्य चर्चेत आलें आहे.

वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर दलजीतने निखिल पटेलशी लग्न केलं आणि लग्नानंतर ती मुलगा जेडनसोबत केन्याला राहायला गेली. निखिल हा केन्यातील फायनान्स सेक्टरमध्ये काम करत असून दलजीत सुटट्यांमध्ये तिथे फिरायला गेली असताना दोघांची भेट झाली होती. या भेटीनंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता लग्नाला वर्षही पूर्ण झालं नसताना दलजीतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील निखिलसोबतचे सर्व फोटो डिलिट केले आहेत. इतकंच नव्हे तर तिने तिच्या अकाऊंटच्या बायोमधून पतीचं आडनावसुद्धा हटवलं आहे.

फक्त दलजीतनेच नाही तर निखिलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दलजीतसोबतचे सर्व फोटो डिलिट केले आहेत. त्याने फक्त त्याच्या दोन्ही मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर तसेच ठेवले आहेत. याआधी दलजीतने अभिनेता शालीन भनोतशी लग्न केलं होतं. त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत दलजीतने शालीनला घटस्फोट दिला होता. 2015 मध्ये हे दोघं विभक्त झाले. जेडन हा दलजीत आणि शालीन यांचाच मुलगा आहे.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.