AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सुहानीच्या आजारपणाविषयी आमिरला समजलं असतं तर..”; आईकडून खुलासा

सुहानी बॉलिवूडमधील प्रसिद्ध बालकलाकार होती. तिने 2016 मध्ये आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटात दमदार भूमिका साकारली होती. यामध्ये तिने ज्युनिअर बबिता फोगाटची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने बऱ्याच जाहिरातींमध्येही काम केलं होतं.

सुहानीच्या आजारपणाविषयी आमिरला समजलं असतं तर..; आईकडून खुलासा
Suhani Bhatnagar Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 19, 2024 | 4:02 PM
Share

मुंबई : 19 फेब्रुवारी 2024 | आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटात बालपणीच्या बबिता फोगाटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहानी भटनागरच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात तिच्यावर डर्माटोमायोसिटीस (Dermatomyositis) या आजाराशी संबंधित उपचार सुरू होते. दोन महिन्यांपूर्वीच तिला याची लक्षणं जाणवली होती. सुहानीच्या डाव्या हाताला सूज आल्यानंतर या आजाराचं निदान झालं होतं. अनेक डॉक्टरांनी तिच्या या आजारामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप त्यांना यश मिळालं नाही. सुहानीच्या निधनानंतर तिची आई पूजा भटनागर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला. त्याचसोबत यावेळी त्या आमिर खानविषयीही व्यक्त झाल्या.

“आमिर सर नेहमी तिच्या संपर्कात होते. ते खूप चांगले आहेत. सुहानीच्या आजारपणाबद्दल आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं. कारण आधीच आम्ही त्यामुळे चिंतेत होतो. आम्ही त्याविषयी कोणालाच माहिती दिली नव्हती. आम्ही जर त्यांना एक मेसेज जरी पाठवला असता तरी लगेच ते मदतीला धावून आले असते. सुहानीला ओळखत असल्यापासून त्यांची चांगली मैत्री झाली होती. आम्हाला त्यांच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रणसुद्धा मिळालं होतं. इतकंच नव्हे तर स्वत: आमिर सरांनी फोन करून लग्नाला बोलावलं होतं”, असं पूजा भटनागर म्हणाल्या.

सुहानीच्या आजारपणाबद्दल सांगताना त्या पुढे म्हणाल्या, “या इंडस्ट्रीमध्ये आम्ही जी काही ओळख आहे, ती सुहानीमुळेच आहे. ती खूप हुशार होती आणि प्रत्येक काम उत्तम करण्याची जिद्द तिच्यात होती. मात्र हाताला सूज आल्यानंतर तिची सर्व स्वप्नं अधुरी राहिली. सुरुवातीला हा फक्त त्वचेचा आजार आहे असं आम्हाला वाटलं होतं. आम्ही तिला काही डर्मटोलॉजिस्टकडेही घेऊन गेलो होतो, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दिल्लीतल्या एम्समध्ये दाखल केल्यानंतर तेला डर्माटोमायोसिटीस असल्याचं निदान झालं होतं. मात्र उपचारादरम्यान तिला संसर्ग झाला आणि शरीरात पाणी भरलं.”

सुहानीच्या निधनाविषयी कळताच आमिर खान प्रॉडक्शन्सकडून सोशल मीडियावर पोस्ट लिहिण्यात आली होती. या पोस्टद्वारे सुहानीच्या निधनाविषयी शोक व्यक्त करण्यात आला होता. 2016 मध्ये ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा