AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dashavatar Collection : ‘कोकणातला कांतरा’ ठरतोय सुपरहिट; सगळीकडे शोज हाऊसफुल्ल, तर इतक्या कोटींची कमाई

‘दशावतार’च्या माध्यमातून प्रेक्षकांना कोकणातील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा अप्रतिम संगम पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवत असून, कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. यासोबतच गाणी, देखावे आणि दिग्दर्शनातील भव्यता ही चित्रपटाची खरी ताकद ठरली आहे.

Dashavatar Collection : 'कोकणातला कांतरा' ठरतोय सुपरहिट; सगळीकडे शोज हाऊसफुल्ल, तर इतक्या कोटींची कमाई
dashavatar Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 15, 2025 | 7:11 PM
Share

मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेल्या झी स्टुडियोज प्रस्तुत ‘दशावतार’ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून थिएटरमध्ये ‘दशावतार’ची जादू अनुभवण्यासाठी गर्दी उसळली आहे. चित्रपट समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षकांकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रदर्शनाच्या पहिलत्या तीन दिवसांतच या चित्रपटाने तब्बल 5 कोटी 22 लाख रुपयांचा गल्ला जमवला असून तो प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला आहे.

प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने सर्वत्र चांगली हवा निर्माण केली होती. पोस्टरपासूनच चित्रपटाबद्दल निर्माण झालेलं कुतूहल पुढे टीझरमधून अधिकच वाढलं आणि नंतर आलेल्या ट्रेलरमुळे ही उत्सुकता शिगेला पोहोचली. त्याचीच प्रचिती चित्रपट प्रदर्शनानंतर मिळणाऱ्या प्रतिसादातून बघायला मिळत आहे. सुरुवातीला तब्बल 325 स्क्रिन्समधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या दशावतारचे 600 शोज होते, शनिवारी हा आकडा 800 एवढा झाला तर रविवारी यामध्ये वाढ होऊन तो 975 शोज असा झाला. सर्वत्र हाऊसफुल्ल बोर्ड झळकत असून प्रेक्षकांकडून ‘दशावतार’ ला प्रचंड दाद मिळत आहे.

निर्माते, दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, ”दशावतार’ला मिळणारा हा प्रतिसाद म्हणजे आमच्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. दशावतारमधून कोकणातील कला आणि संस्कृतीसोबतच पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल केलेल्या भाष्याला प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे. प्रामाणिकपणे सांगितलेल्या गोष्टीला प्रेक्षक खुल्या मनाने स्विकारतात हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालंय. प्रत्येकाने घेतलेली मेहनत सार्थकी लागल्याचे समाधान आहे.”

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, “मराठीतील चोखंदळ प्रेक्षक कायमच चांगल्या कलाकृतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. केवळ मुंबई-पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे बेळगाव, बेंगळुरु, इंदौर, हैद्राबाद आणि गोव्यातही हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. दशावतार मुळे मराठी चित्रपटांचा आणि मराठी सिनेसृष्टीचा दबदबा पुन्हा एकदा निर्माण होईल असा विश्वास आम्हाला आहे. या चित्रपटाला मिळालेला हा प्रतिसाद अभूतपूर्व असून याबद्दल प्रेक्षकांचे झी स्टुडियोजच्यावतीने आभार मानतो.”

चित्रपटाची भव्यता, नेत्रदीपक दृश्यं आणि ताकदीचं कथानक यामुळे प्रेक्षक पुन्हा पुन्हा थिएटरकडे धाव घेत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील हा एक मैलाचा दगड ठरत असून ‘दशावतार’ ने केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर प्रेक्षकांच्या मनातही राज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला तर थिएटर मालकही मराठी चित्रपटांना प्राधान्य देत शोज वाढवतात हे दिसून येत आहे.

झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांचे असून त्यांच्यासह सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.