2 महिन्यांतच रंगेहात पकडलं..; चहलने धनश्रीची केली होती फसवणूक? पूर्व पत्नीकडून मोठा खुलासा
'राइज अँड फॉल' या शोमध्ये धनश्री नात्यातील फसवणुकीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. कुब्रा सैतने विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना तिने खुलासा केला की पहिल्या वर्षातच पार्टनरने तिची फसवणूक केली होती.

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा लग्नाच्या चार वर्षांतच विभक्त झाले. 2020 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. या दोघांनी घटस्फोट का घेतला, याची चर्चा अजूनही होते. धनश्री सध्या ‘राइज अँड फॉल’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच शोमध्ये ती पूर्व पती युजवेंद्रबद्दल सतत व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी तिने घटस्फोटानंतरच्या पोटगीचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता तिने फसवणुकीचा नवीन खुलासा केला आहे. या शोमध्ये तिने युजवेंद्रचं नाव न घेता सांगितलं की, तिची नात्यात फसवणूक झाली होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेत्री कुब्रा सैत धनश्रीला विचारते की, “तुमचं नातं अजून टिकू शकणार नाही, असं तुला कधी वाटलं होतं? तो क्षण कोणता होता?” त्यावर उत्तर देताना धनश्री सांगते, “पहिल्याच वर्षी समजलं होतं. त्याला दोन महिन्यांनंतर मी रंगेहात पकडलं होतं.” हे उत्तर ऐकून कुब्रा चकीत होते. त्यानंतर कुब्रा तिला सल्ला देते की, “तू तुझा वेळ घे. तुला जेव्हा त्याबद्दल बोलावंसं वाटेल, तेव्हाच तू बोल.”
View this post on Instagram
‘राइज अँड फॉल’ या शोमध्ये धनश्रीने याआधी पोटगीविषयीचाही खुलासा केला होता. गायक आदित्य नारायणने सर्वांसमोर तिला तिच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तरं देताना धनश्रीने पोटगीचा उल्लेख केला होता. आदित्यने तिला विचारलं, “घटस्फोट घेऊन किती दिवस झाले?” त्यावर धनश्री म्हणाली, “जवळपास एक वर्ष.” तेव्हा अभिनेत्री कुब्रा सैत म्हणते, “तुम्हाला फार लवकर घटस्फोट मिळाला.” हे ऐकताच धनश्री स्पष्ट करते, “कारण आम्हा दोघांना घटस्फोट हवा होता. त्यामुळे जेव्हा लोक पोटगीचं बोलतात, ते चुकीचं आहे.”
2025 या वर्षाच्या सुरुवातीलाच धनश्री आणि चहल विभक्त झाले. यादरम्यान चहलच्या एका टी-शर्टने नेटकऱ्यांचं विशेष वेधलं होतं. ‘Be Your Own Sugar Daddy’ असा मजकूर त्यावर लिहिला होता. त्यावरून धनश्रीने केवळ पैशांसाठी चहलशी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
