AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आज ते असते तर..’ धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळताच लेकीला अश्रू अनावर, भावूक होऊन म्हणाली…

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हेमा मालिनी आणि कन्या आहनाने हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी अनुपस्थित असलेल्या ईशा देओलने आपल्या पित्यासाठी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली, ज्यात तिने कुटुंबाच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. देओल कुटुंबीयांसाठी हा अभिमानाचा आणि भावनिक क्षण होता.

'आज ते असते तर..' धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळताच लेकीला अश्रू अनावर, भावूक होऊन म्हणाली...
धर्मेंद्र यांच्या लेकीची भावूक पोस्टImage Credit source: social media
| Updated on: May 26, 2026 | 12:50 PM
Share

सोमवार, 25 मे रोजी दिवंगत, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील शानदार योगदानासाठी मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याची दुसरी पत्नी, अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची दुसरी लेक आहना देखील उपस्थित होती. वडिलांचा या पुरस्काराने झालेला सन्मान पाहून तिच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. पण आहना हिची मोठ बहीण, धर्मेंद्र यांची मोठी लेक इशा देओरे यावेळी उपस्थित राहू शकली नाही. मात्र आता तिने शोल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या भवान व्यक्त केल्या. तिची ही पोस्ट वाचून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. चाहत्यांनी इशाची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात लाईक केली.

देओल कुटुंबीय सोहळ्याला अनुपस्थित

काल, म्हणजेच सोमवार 25 मे रोजी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. या कार्यक्रमाला हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी अहना उपस्थित होत्या. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील इतर सदस्य यावेळी अनुपस्थित होते. धर्मेंद्र यांची मुलं, सनी देओल आणि बॉबी देओल हे यावेळूी उपस्थित राहतील अशी चाहत्यांना आशा होती, पण ते आलेच नाहीत. या कार्यक्रमानंतर हेमा मालिनी यांनी माध्यमांशी संवाद साधला. “माझ्यासाठी हा एक अत्यंत भावनिक क्षण आहे. अहना माझ्यासोबत आहे, खरंतर ईशालाही ( या कार्यक्रमासाठी) यायचं होतं पण काही कारणामुळे ती येऊ शकली नाही. संपूर्ण कुटुंब या आनंदात सहभागी आहे. सनी, बॉबी आणि सर्वांना या सन्मानाची जाणीव आहे आणि हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे ,” अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर हेमा मालिनी यांनी दिली.

इशा देओल हिची भावूक पोस्ट

दरम्यान धर्मेंद्र यांची लेक, अभिनेत्री इशा देओलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. “हा अभिमान आणि भावनांनी भरलेला क्षण आहे. आज ते आपल्यासोबत असते तर.. त्यांचा आवडता पांढरा शर्ट आणि निळ्या सूटमध्ये नेहमीप्रमाणेच अतिशय देखणे दिसले असते. हा प्रतिष्ठित सन्मान स्वीकारण्यासाठी एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने पुढे गेले असते.” असं इशाने लिहीलं.

“काल, जेव्हा माझ्या आईने आमच्या कुटुंबाच्या वतीने हा सन्मान स्वीकारला, तेव्हा आम्हा सहा भावंडांच्या वतीने सर्वात लहान असलेली अहाना उभी राहिली आणि तिने आपल्या अश्रूंनी व टाळ्यांच्या गजराने बाबांचा सन्मान केला,” अशा शब्दांत इशाने तिच्या भावना मांडल्या.  ” त्यांच्यावर आमचं जीवापाड प्रेम होतं, आम्हाला त्यांची प्रत्येक क्षणी आठवण येते, आणि आम्हाला नेहमीच त्यांचा अभिमान वाटेल. आमचे बाबा,  आमच्या हृदयात कायम जिवंत राहतील”असंही इशाने पुढे या पोस्टमध्ये लिहीलं. तिची ही भाविनक पोस्ट हजारो चाहत्यांनी लाईक केली.

2012 साली मिळाला होता पद्म भूषण

गेल्या वर्षी, नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. ते बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून प्रसिद्ध होते. जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम करून धर्मेंद्र यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर आपली अमिट छाप सोडली. विशेष म्हणजे, धर्मेंद्र यांना 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. तर यंदा त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल