AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 : धुरंधर 2 चं पाकिस्तानात वादळ, रिलीज होताच नेटफ्लिक्सला मोठा झटका

भारतात 'धुरंधर' चित्रपटाची कितीही क्रेझ असली तरी, पाकिस्तानच्या लोकांच्या क्रेझची बरोबरी करू शकत नाही. आता बघा, ज्या देशात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, तिथेच जेव्हा या चित्रपटा दुसरा भाग ओटीटीवर प्रदर्शित झाला, तेव्हा गदारोळ माजला.

Dhurandhar 2 : धुरंधर 2 चं पाकिस्तानात वादळ, रिलीज होताच नेटफ्लिक्सला मोठा झटका
धुरंधर 2 ची पाकमध्येही क्रेझ
| Updated on: May 16, 2026 | 11:03 AM
Share

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेल्या ‘धुरंधर 2’ ने भारत आणि परदेशात विक्रमी कमाई केली आहे. 19 मार्ला रिलीज झालेला हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमध्ये तूफान कामगिरी करताना दिसत आहे. त्यातच आता धुरंधर 2 ओटीटीवर पदार्पण करणार आहे, पण भारताच्या आधीच तो पाकिस्तानात प्रदर्शित झाला. धुरंधर 2 पाकिस्तानात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून, आणि त्याला जो रिस्पॉन्स मिळाला त्याचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे.

धुरंधरसारख्या चित्रपटांमुळे त्रास होतो हे पाकिस्तानी जनता कितीही नाकारत असली तरी, आतून त्यांना त्या चित्रपटांमधील सत्य पाहण्याची तीव्र इच्छा आहे. याचीच एक झलक शुक्रवारी रात्री दिसली. आदित्य धरचा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ जगभरात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

बंदी असूनही पाकिस्तानमध्येही रिलीज झाला चित्रपट आणि..

धुरंधरच्या दोन्ही भागांवर पाकिस्तानसह आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे, जेव्हा तो ओटीटीवर आला, तेव्हा पाकिस्तानातील लोक नेटफ्लिक्स उघडून तो पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते, असंच दिसतंय. आदित्य धरचा चित्रपट येताच तो पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. कारण नेटफ्लिक्सवर हा चित्रपट येताच त्याचा सर्व्हरच डायरेक्ट क्रॅश झाला. खरं तर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असं सांगितलं जात आहे की ‘धुरंधर’ प्रदर्शित झाल्यानंतर नेटफ्लिक्स काही काळासाठी ऑफलाइन झालं होतं.

आम्ही वाटच पहात होतो

पाकिस्तानी कंटेंट क्रिएटर माविया उमर फारुकीने तिच्या ‘काम वाली बात’ या पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. “आज पाकिस्तानात ‘धुरंधर’ प्रदर्शित झाला आणि सर्व्हर क्रॅश झाला. पाकिस्तानी लोक नेटफ्लिक्सवर चित्रपट डाउनलोड करून एकत्र क्लिक करण्यासाठी मध्यरात्रीची वाट पाहत होते. इथे ‘धुरंधर’ची क्रेझ अशाप्रकारे दिसून आली,” असं तिने व्हिडीओमध्ये सांगितल.

या चित्रपटाच्या विषयावर बरीच राजकीय चर्चा होत असली तरी, पाकिस्तानी लोकांना हा चित्रपट पाहायचा आहे असंही या कंटेंट क्रिएटरने असंही नमूद केलं. ” आता खरं खोटं काहीही दाखवलं असलं, तरी ती वेगळी गोष्ट आहे. पण चित्रपट कसा बनलाय ते पाकिस्तानी लोकांना पाहायचे आहे. रणवीर सिंगचे पात्र कसं आहे हे सर्वांना माहीत आहे. लयारीमध्ये हे खरोखर घडले की नाही, हा नंतरचा प्रश्न आहे.” असंही तिने लिहीलं.

भारतीय युजर्सनी घेतली मजा

पाकिस्तानी कंटेंट क्रिएटरच्या या व्हिडीओची भारतीय युजर्सनी मजा घेतली. एवढ्या अडचणी असूनही तुम्हाला इंटरनेट मिळतं का, आणि नेटफ्लिक्सचे पैसे भरू शकतो का, असे प्रश्न युजर्सनी विचारले. एका वापरकर्त्याने तर पाकिस्तानात टीव्ही असल्याबद्दलही ट्रोल केलं.

भारतात ओटीटीवर कधी दिसणार धुरंधर 2 ?

विशेष म्हणजे, धुरंधरमध्ये, ओमरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आदित्य उप्पलनेही हा व्हिडिओ लाईक केला आहे. पाकिस्तानमधील धुरंधरची क्रेझ पाहता, धुरंधर 2 भारतात कधी प्रदर्शित होईल, असा प्रश्न अनेकांना नक्कीच पडला असेल. आदित्य धरचा हा चित्रपट 5 जून २०२५ रोजी जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होण्यास सुरुवात होईल. याचा ग्रँड प्रीमियर त्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच 4 जून रोजी सायंकाळी 7 वाजता होईल.

Follow Us
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.