Dhurandhar फेम रेहमान डकैतचं खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य, माझी काळजी करणारं कोणी नाही आणि…
Dhurandhar : वयाच्या 50 व्या वर्षी देखील एकटाच राहतो अक्षय खन्ना, नाही केलं लग्न... आता म्हणातो, 'माझी काळजी करणारं कोणी नाही आणि... ', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय खन्ना याची चर्चा सुरु आहे.

Dhurandhar Akshaye Khanna : काही दिवसांपासून अनेक वर्षांपासून पडद्यामागे असलेले सेलिब्रिटी आज मोठ्या पडद्यावर राज्य करत आहेत. आता तर त्यांनी अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांना देखील मागे पाडलं आहे… अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता अक्षय खन्ना… अक्षय खन्ना सध्या ‘धुरंधर’ सिनेमातील त्याच्या रेहमान डकैत या भुमिकेमुळे चर्चेत आहे. अनेकांनी अभिनेत्याला डोक्यावर घेतलं आहे. मोठ्या पडद्यावर दोन मुलांच्या बापाची भूमिका साकारणारा अक्षय खऱ्या आयुष्यात एकटाच राहतो…
अक्षय खन्ना याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अद्याप लग्न केलेलं नाही. वयाच्या 50 व्या वर्षी देखील तो एकटाच आहे… एवढ्या वर्षांनंतर त्याने कधी मुल दत्तक घेण्याचा देखील विचार केला नाही… यासाठी अभिनेता स्वतःला भाग्यशाली समजतो… एका मुलखतीत, तो स्वतःला भाग्यवान असल्याचं सांगतो कारण त्याच्यावर स्वतःची काळजी घेण्याशिवाय इतर कोणत्याही मोठ्या जबाबदाऱ्या नाहीत. असं अभिनेता म्हणालेला..
अक्षय कुमार म्हणाला, ‘मुल आहे याची कोणती मोठी जबाबदारी माझ्यावर नाही… अशी कोणतीच जबाबदारी नाही ज्यामुळे मला जबाबदार राहवं लागेल. पत्नी आणि मुलं नाहीत आणि मला ती जबाबदारी देखील नको आगे… मी एकटा आहे आणि आनंदी आहे… कोणी काळजी करणारं नाही… कोणी त्रास देणारं नाही… मला स्वतःसाठी त्रास घ्यायचा आहे… हे जग फार सुंदर आहे…’ असं देखील अभिनेता म्हणालेला.
अक्षय खन्ना याचे आई – वडील आणि अफेअर्स…
अक्षय खन्ना हा अभिनेते विनोद खन्ना आणि गीतांजली खन्ना यांचा मुलगा आहे. अभिनेत्याच्या आई – वडिलांचं निधन झालं आहे. त्याच्या भावाच नाव राहुल आणि तो देखील अभिनेता आहे. अक्षय खन्ना एकटाच राहतो. करिश्मा कपूर, ऐश्वर्या राय, श्रिया सरन, तारा शर्मा आणि उर्वशी शर्मा यांसारख्या अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडण्यात आलं.
‘धुरंदर’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांनी मुख्य भूमिका बजावली आहे. ‘धुरंदर’ सिनेमा 5 डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला असून, सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत जवळपास 126.57 रुपयांचं कलेक्शन केलं आहे.
