करिश्मा कपूरच्या प्रेमात वेडा होता ‘धुरंधर’ स्टार; लग्नात पतीसमोर तिच्या हातावर केलं होतं किस, पाहतच राहिले सर्वजण
'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतोय. या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहेत. विशेषकरून एक भूमिका सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. हा अभिनेता एकेकाळी करिश्मा कपूरच्या प्रेमात वेडा होता. पण तिच्याशी कधीच त्याचं लग्न होऊ शकलं नाही.

बॉलिवूडच्या झगमगत्या विश्वात नाती जितक्या सुंदर दिसतात, तितक्याच त्या गुंतागुंतीच्याही असतात. अशीच एक कहाणी अभिनेता अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूर यांची आहे. या दोघांमध्ये एकेकाळी अत्यंत खास नातं होतं. परंतु हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. नंतर करिश्माने संजय कपूरशी लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली. याच लग्नातील एक खास क्षण अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतो. अक्षय खन्नाने आजवर लग्न केलं नाही, तर दुसरीकडे करिश्माचंही वैवाहिक आयुष्य फार काळ टिकलं नाही. करिश्मा तिच्या दोन मुलांसोबत एकटीच राहतेय. नव्वदच्या दशकात करिश्माचं नाव बऱ्याच अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं, परंतु अक्षय खन्ना आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबतच्या तिच्या नात्याची सर्वाधिक चर्चा झाली.
अक्षयसोबतची तिची केमिस्ट्री केवळ पडद्यावरच नाही तर पडद्यामागेही दिसली. असं म्हटलं जातं की हे दोघं एकमेकांशी लग्न करणार होते आणि करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनीसुद्धा त्यांच्या नात्याला स्वीकारलं होतं. परंतु करिश्माची आई बबिता या त्यांच्या नात्याविरोधात होत्या. त्यांना करिश्माच्या करिअर आणि अक्षयच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबाबत संशय होता. त्यामुळे हे नातं लग्नापर्यंत पोहोचूच शकलं नव्हतं.
29 सप्टेंबर 2003 रोजी करिश्मा कपूरने बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं. गुरुद्वारामध्ये विवाहविधी पार पडल्यानंतर कृष्णराज बंगल्यात रिसेप्शन झालं. या रिसेप्शनला बॉलिवूडपासून राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. याच पाहुण्यांमध्ये अक्षय खन्नाचाही समावेश होता. एकेकाळी करिश्माच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण भाग असलेल्या अक्षयने फक्त त्या लग्नात हजेरीच लावली नाही तर अत्यंत आदरपूर्वक आणि सौम्यतेनं त्याने करिश्माला शुभेच्छासुद्धा दिल्या. हा व्हिडीओ आजही सोशल मीडियावर पहायला मिळतो. यामध्ये करिश्मा गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसून येत आहे. अक्षय जेव्हा तिची भेट घेतो, तेव्हा तिच्या हातावर अलगद किस करतो आणि शुभेच्छा देतो. हा क्षण एका अपूर्ण नात्याला अत्यंत सुंदर पद्धतीने शेवट दिल्यासारखा होता, तेसुद्धा कोणत्याही कटुतेशिवाय आणि कोणत्याही तक्रारीशिवाय.

या रिसेप्शनला अक्षयसोबत त्याचा भाऊ राहुल खन्ना आणि आई गीतांजलीसुद्धा उपस्थित होती. या घटनेवरून हे सिद्ध होतं की जरी प्रेमाचा शेवट लग्न होऊ शकला नाही, ते नातं टिकू शकलं नाही तरी एकमेकांविषयी आदर आणि आपलेपणाची भावना कायम टिकून राहिली. दुर्दैवाने करिश्माचा संसारही फार काळ टिकू शकला नाही. 2016 मध्ये तिने घटस्फोट घेतला.
अक्षय खन्ना सध्या त्याच्या दमदार भूमिकांमुळे चर्चेत आहे. ‘छावा’मध्ये त्याने क्रूर औरंगजेबाची भूमिका साकारली. त्यानंतर आता ‘धुरंधर’मधील तो रेहमान डकैतच्या भूमिकेमुळे तो सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
