18 वर्षाखालील मुलांना 113 मिनिटाचा हा चित्रपट पाहण्यास मनाई, तरीही 80 कोटींची कमाई; असं काय आहे त्यात?
113 मिनिटांच्या या चित्रपटाला 18 वर्षांखालील लोकांना पाहता येणार नाही. तरीही बॉक्स ऑफिसवर या चित्रपट चांगलाच गाजताना दिसत आहे. २५ कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने ८० कोटी रुपये कमावले आहेत.

एखाद्या चित्रपटाला १८ वर्षांखालील लोकांना पाहता येत नाही असे सर्टिफिकेट मिळाले की प्रेक्षकांची मोठी संख्या आपोआप कमी होते. असेच काही या चित्रपटाच्या बाबतीतही घडले. हा एक हॉरर सिनेमा आहे. हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज झाला तेव्हा त्याला ‘ए’ म्हणजे अॅडल्ट सर्टिफिकेट मिळाले. त्यामुळे फक्त प्रौढांनाच तो पाहता येऊ शकलो. आता हॉरर सिनेमा आणि मर्यादित प्रेक्षक त्यामुळे चित्रपटाच्या भविष्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पण आता या ११३ मिनिटांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. २५ कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने ८० कोटी रुपये कमावले आहेत.
मल्याळम इंडस्ट्रीचे सुपरस्टार मोहनलाल यांनी इंडस्ट्रीत आपल्या शानदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या चित्रपटांची लोक वाट पाहत असतात. मोहनलालांसारखेच त्यांचे पुत्र प्रणव मोहनलाल यांनीही इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी जागा बनवली आहे. प्रणवही उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने एकापेक्षा एक सरस हिट चित्रपट दिले आहेत. सध्या त्याचा ‘डाइस इरे’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे.
किती केली कमाई?
‘डाइस इरे’बद्दल बोलायचे झाल्यास हा चित्रपट ३१ ऑक्टोबरला सिनेमागृहात रिलीज झाला आणि तेव्हापासून बॉक्स ऑफिसवर छाप सोडत आहे. ‘डाइस इरे’ला जगभरात प्रचंड पसंती मिळाली आहे. हा एक हॉरर चित्रपट आहे जो ब्लॉकबस्टर ठरला आहे. हॅलोविनला प्रणवचा हॉरर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. यापेक्षा चांगले काही असू शकत नव्हते. अहवालानुसार या चित्रपटाने जगभरात ८० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
प्रणव मोहनलालचा हा हॉरर चित्रपट ‘ए’ रेटेड आहे. तो सलग ब्लॉकबस्टर चित्रपट देत आहेत. याही चित्रपटाने ८० कोटींचा पल्ला पार केला आहे. त्याच्या सलग अनेक चित्रपटांनी ८० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाचे बजेट सुमारे २५ कोटी रुपये सांगितले जात आहे.
चित्रपटाविषयी
‘डाइस इरे’मध्ये प्रणवसोबत सुष्मिता भट्ट आणि शाइन टॉम चाको महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. या हॉरर थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल सदाशिवन यांनी केले आहे. प्रणव गेल्या अनेक वर्षांपासून मल्याळम इंडस्ट्रीत काम करत आहेत. तो आपले वडील मोहनलाल यांच्यासारखे लोकांच्या मनात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झाल्याचे दिसत आहे.
