वर्षभरातच सलमानच्या बहिणीला घटस्फोट देणाऱ्या अभिनेत्याचं पुढच्या महिन्यात लग्न?

'फुकरे', 'पागलपंती' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या या अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी साखरपुडा केला. त्यानंतर आता मार्चमध्ये हे दोघं लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या अभिनेत्याचं नाव आधी यामी गौतमशीही जोडलं गेलं होतं.

वर्षभरातच सलमानच्या बहिणीला घटस्फोट देणाऱ्या अभिनेत्याचं पुढच्या महिन्यात लग्न?
Pulkit Samrat Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 8:41 AM

मुंबई : 15 फेब्रुवारी 2024 | अभिनेता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुलकित आणि क्रितीचा त्यांच्या कुटुंबीयांसोबतच एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरून दोघांना रोका (साखरपुडा) झाल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत होते. आता ‘व्हॅलेंटाइन डे’ला दोघांनी एकमेकांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यावरून लग्नाची चर्चा रंगली आहे. येत्या मार्च महिन्यात हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. क्रितीने तिच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तशी हिंट दिली आहे. पुलकितचं हे दुसरं लग्न असेल. याआधी त्याने अभिनेता सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिराशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 11 महिन्यांतच दोघं विभक्त झाले.

पुलकित आणि क्रिती हे गेल्या चार-पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘पागलपंती’ या चित्रपटात काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. दोघांनी ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘ताईश’ या चित्रपटांमध्येही काम केलंय. क्रितीला डेट करण्यापूर्वी पुलकितचं नाव अभिनेत्री यामी गौतमशीही जोडलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर यामीमुळेच पुलकितचं श्वेताशी लग्न मोडलं, अशीही चर्चा होती.

हे सुद्धा वाचा

श्वेता आणि पुलकितने 2014 मध्ये लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 11 महिन्यांतच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर दिलेल्या एका मुलाखतीत श्वेताने यामीवर आरोप केले होते. ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत श्वेता म्हणाली होती, “यामी गौतमने माझं लग्न मोडलं होतं. मात्र मी या भ्रमातून बाहेर पडले आहे की काही लोक खोटं बोलत नाहीत. आमच्यात सर्वकाही तोपर्यंत ठीक होतं, जोपर्यंत ती एक व्यक्ती आली नव्हती. 2015 मध्ये माझा गर्भपात झाल्यानंतर पुलकितने यामीला डेट करण्यास सुरुवात केली होती.”

दुसरीकडे पुलकितने श्वेताचे आरोप फेटाळले होते. “यामी या सगळ्यात कुठेच नव्हती. गर्भपाताविषयी जेव्हा मी आर्टिकल्स वाचले, तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. कारण ही आमच्या दोघांची खासगी गोष्ट आहे. आम्हा दोघांसाठी तो काळ खूप कठीण होता. त्याला असं सार्वजनिक करणं योग्य नाही. ज्या व्यक्तीसोबत मी इतकी वर्षे राहिलो, तिने मातृत्वसारख्या पवित्र गोष्टीचा वापर करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करावा, हे खूप चुकीचं वाटतं. त्या आर्टिकलला वाचल्यानंतर श्वेता आणि माझं नातं पूर्णपणे संपुष्टात आलं होतं. कारण ते योग्य नव्हतं”, असं तो म्हणाला होता.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.