AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समंथाच्या पूर्व पतीने उरकलं दुसरं लग्न? वरातीचा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क!

या महिन्याच्या सुरुवातीला अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केल्यानंतर आता नाग चैतन्यने गुपचूप लग्न उरकल्याचंही म्हटलं जातंय. कारण त्याच्या वरातीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

समंथाच्या पूर्व पतीने उरकलं दुसरं लग्न? वरातीचा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क!
Naga Chaitanya and Sobhita DhulipalaImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 28, 2024 | 8:40 AM
Share

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती आणि दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. फक्त कुटुंबीयांच्या उपस्थितीत या दोघांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर आता नाग चैतन्यचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून त्याने गुपचूप लग्न उरकल्याचं म्हटलं जातंय. हा व्हिडीओ 27 ऑगस्टचा असून त्यात नाग चैतन्य फुलांनी सजलेल्या कारमध्ये बसल्याचं पहायला मिळतंय. या कारच्या आजूबाजूला बँड बाजा वाजत असून काही लोक नाचत आहेत. ही नाग चैतन्यच्या लग्नाची वरात असल्याची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.

एखादी वरात जशी निघते, त्याप्रमाणेच हा व्हिडीओ असल्याने नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाविषयी जोरदार चर्चा होत आहेत. यावेळी त्याने शेरवानी परिधान केला असून एका आलिशान कारमध्ये तो बसलाय. या कारच्या पुढे बँड बाजा वाजत असून काही लोक डान्स करत आहेत. हा व्हिडीओ हैदराबादमधील असल्याचं कळतंय. सोभिता आणि नाग चैतन्य यांनी हैदराबादमध्येच साखरपुडा केला होता. या व्हिडीओवर अद्याप सोभिता किंवा नाग चैतन्यच्या कुटुंबीयांकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. नाग चैतन्यच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

नाग चैतन्यच्या साखरपुड्यानंतर त्याचे वडील आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांनी प्रतिक्रिया दिली होती. “सोभिता आणि नागार्जुन लग्न करतील, मात्र आम्हाला काही घाई नाही. आम्ही साखरपुड्याची घाई यासाठी केली, कारण तो दिवस खूप शुभ होता”, असं त्यांनी सांगितलं होतं. नाग चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर समंथाशी असलेल्या नात्यात काही कटुता आली का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितलं की, समंथा ही नेहमीच त्यांच्यासाठी सुनेसारखी नाही तर मुलीसारखी होती आणि पुढेही असेल. “आमचं नातं कधीच बदलणार नाही. त्यांच्या नात्यात काय घडलं, ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. पण माझ्यासाठी समंथा नेहमीच माझ्या मुलीसारखी आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

समंथा आणि नाग चैतन्यने 2017 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर नाग चैतन्यचं नाव सोभिताशी जोडलं गेलं. 8 ऑगस्ट 2024 रोजी नाग चैतन्य आणि सोभिताने मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला.

'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.