AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मिस्टर इंडिया’मध्ये दगडधोंडे खाणारा चक्क केदार शिंदेंचा नातेवाईक, ‘तेजाब’ची थक्क करणारी कहाणी!

बॉलिवूडमधील गाजलेल्या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'मिस्टर इंडिया.' या चित्रपटातील तेजाब हे पात्र विशेष चर्चेत होते. पण तुम्हाला माहिती आहे का तेजाब खऱ्या आयुष्यात महाराष्ट्राचा जावई होता. जाणून घ्या त्याच्याविषयी...

'मिस्टर इंडिया'मध्ये दगडधोंडे खाणारा चक्क केदार शिंदेंचा नातेवाईक, 'तेजाब'ची थक्क करणारी कहाणी!
Mr indiaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 18, 2026 | 4:48 PM
Share

अनिल कपुरचा ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट तुम्ही पहिलाच असेल. या चित्रपटात एका सिनमध्ये ‘मिस्टर इंडिया’ हनुमानाची सोन्याची मूर्ती घेऊन खलनायकांना बदडून काढतो. तेजसाहेब या पात्राला जेवणात दगड असले तरी जबरदस्ती खायला लावतो. यावेळी तेजासाहेबांचा झालेला केविलवाणा चेहरा पाहून अगदी पोट धरून हसायला येत. या तेजसाहेबांचा रोल करणारे कलाकार होते अभिनेते अजित वाच्छानी. ते महाराष्ट्राचे जावई आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी…

तुम्ही जर ८० ते ९० च्या सिनेमाचे फॅन असाल खासकरून सुरज बडजात्या यांच्या यांचे चित्रपट पहिले असतील तर अजित वाच्छानी हा ओळखीचा चेहरा नक्कीच असेल. अजित वाच्छानी हे मूळचे सिंधी असले तरी गुजराती रंगभूमीवर त्यांचं मोठं नाव होत. शिवाय हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार होते. ९०च्या दशकातील हिंदी मालिका त्यांच्याशिवाय पूर्णच होत नसत. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर या त्रिकुटाच्या ‘एकापेक्षा एक’मध्ये देखील ते झळकले होते.

अजित वाच्छानी महाराष्टाचे जावई

पण फार कमी जणांना माहित असेल कि हिंदी गुजरातीतला हा मोठा स्टार चक्क महाराष्ट्राचा जावई होता. होय, अजित वाच्छानी हे महाराष्ट्र भूषण शाहीर साबळे यांचे जावई होते. अजित वाच्छानी यांनी शाहीर साबळे यांची मुलगी चारुशीला साबळे यांच्याशी लग्न केलं होते. चारुशीला साबळे या देखील मराठी सिनेसृष्टी रंगभूमीवरीलला लोकप्रय अभिनेत्री आहेत. चारुशीला यांनी अनेक हिंदी नाटकांमध्ये देखील काम केले आहे. या दोघांची भेट एक नाटकाचा प्रयोगादरम्यानच झाली होती.

कशी झाली दोघांची भेट?

एका कॉमन मित्राद्वारे चारुशीला आणि वाच्छानी यांच्यात मैत्री झाली. अजित यांना चारुलता फार आवडल्या होत्या आणि त्यांनी त्त्यांचाकडे लग्नाची मागणी घातली होती. चारुशीला साबळे यांनी अजित वाच्छानी यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र २५ ऑगस्ट २००३ रोजी अजित वाच्छानी यांचं हृद्यविकाराने मृत्यू झाला . त्यांची एक मुलगी त्रिशाला ही एअरहोस्टेस आहे व दुसरी योहाना गुजराती रंगभूमीवरील अभिनेत्री आहे.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.